राजकारणासाठी जनतेशी खेळू नका – मा. कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात
मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याच्या टँकर उपलब्ध करून द्या

टंचाई आढावा बैठक संपन्न 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 
चालू वर्षी अलनिनो च्या प्रभावामुळे  कमी  व उशिरा पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने  मागेल त्यांना रोजगार हमीचे काम व मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या अशा सूचना माजी कृषी व महसूलमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, मा.सभापती सौ.सुनंदाताई जोर्वेकर, मा.उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प.सदस्य अजय फटांगरे, सौ.मिराताई शेटे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव सांगळे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, विष्णुपंत  रहाटळ,बी.आर.चकोर, सुभाष सांगळे, विजय राहणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी गटविकास अधिकारी अनिल नागणे,प्र.तहसीलदार गणेश तळेकर, शितल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, डॉ. सुरेश घोलप आदिंसह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी अललिनोच्या प्रभावामुळे उशिरा येणारा पाऊस आणि कमी पाऊस या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे .ज्या गावात रोजगार हमी कामाची मागणी किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी असेल तर तात्काळ उपलब्ध करून द्या.
तालुका हा विस्ताराने मोठा असून सर्व ग्रामसेवक व तलाठी यांनी गावच्या समस्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. हा अडचणीचा काळ असून 30 जुलै पर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे, रोजगार हमीच्या कामाचे व चाऱ्याचे नियोजन करा.
जलजीवन व जीवन प्राधिकरणच्या योजनांची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत. ती बंद होता कामा नये . नळ योजना दुरुस्त करून घ्या . पिण्याचे पाणी रोजगार हमीची कामे आणि चारा याबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहावे असे सांगताना अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली सर्व कामे अधिक चांगले होण्यासाठी काम करा. कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही आमदार थोरात यांनी दिल्या आहेत.
आमदार डॉ किरण लहामटे म्हणाले की, जलजीवन व जीवन प्राधिकरणाची कामे चांगली झाली तर आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही. आमदार बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या योजना राबवली असून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांच्या तक्रारी येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले..
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे , मिराताई शेटे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले.
टंचाई बाबत जाहीर केलेल्या गावातील सरपंच ,ग्रामसेवक, तलाठी ,कृषी अधिकारी यांसह शासकीय विभागांचे विविध अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले तर नायब तहसीलदार लोमटे यांनी आभार मानले


राजकारणासाठी जनतेशी खेळू नये

हंगेवाडी व उंबरी बाळापूर येथे जलजीवन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र फक्त राजकारणासाठी या योजना बंद पाडण्याचे काम काही लोक करत असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये. संगमनेर मधील विकास कामे बंद पडण्याचे काही लोक उद्योग करत असून सत्ता येते आणि जाते त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करा अशा कडक सूचनाही आमदार थोरात यांनी दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!