कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पोलिसांसमोरुन राजरोस गायब झालेला बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य सूत्रधार जगदीश शहाणे याला शोधण्यासाठी पोलिसांना अपयश
पोलिसांच्या कामकाजावर उलट सुलट चर्चांना उधाण
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शहरातील मालदाड रोडवर राहणारा जगदीश लक्ष्मण शहाणे या भामट्याने अनेक बँका आणि पतसंस्थांचा सुवर्णपारखी (गोल्ड व्हॅल्युअर) काम पाहीले. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत त्याने विविध चार बँकांमधून ६ कोटी १० लाख १२ हजार ११६ रुपयांचे तारण ठेवलेले बनावट सोने खरे असल्याचे बँकांना भासवून सर्व प्रकरणे मंजूर केली. त्याचे विरोधात गुन्हा दाखल होवून दोन महीने झाले असून तो
फरार होवून दोन महीने उलटूनही तो पोलिसांना सापडला नाही.
फेब्रुवारीत महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेत त्याने केलेल्या १३७ प्रकरणातील ३३ कर्जप्रकरणांत बनावट सोने आढळून आल्यानंतर पहिल्यांदा वाचा फुटली. मात्र त्या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामीन मिळताच कोट्यावधी रुपये घेवून पसार झाला . दरम्यान २० मार्च रोजी नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेत त्याने १३६ जणांच्या संगनमताने तब्बल ४ कोटी २० लाख १५ हजार ८९० रुपयांचे सोने तारण ठेवून त्या बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. तर त्या पाठोपाठ जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेत ३६ खात्यांद्वारे २२ आरोपींनी ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपये व प्रवरा सहकारी बँकेतील आठ प्रकरणांमधून ३८ लाख ४४ हजार ४४२ रुपयांची रक्कम बनावट सोने तारण ठेवून त्याने प्राप्त केल्याचे उघड झाले आहे. एकामागून एक बँकांमध्ये झालेले हे सोने घोटाळे समोर आल्यानंतर जिल्ह्यात व संगमनेरातील बँका आणि पतसंस्थांचे धाबे दणाणलेले असतांना पोलिसांना मात्र अद्यापही या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचे धक्कादायक वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बनावट सोने प्रकरणात आत्तापर्यंत चार प्रकरणांमधून १९९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिले तीन गुन्हे दाखल होवून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र शहर पोलिसांनी मुख्य सूत्रधार जगदीश शहाणे याच्यासह एकाही कर्जदाराला अद्यापपर्यंत शोधण्याचा अथवा चौकशीकामी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले नाही. कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पोलिसांसमोरुन राजरोस गायब झालेला मुख्य सूत्रधार जगदीश शहाणे याला शोधण्यासाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत कोणतीही हालचाल केलेली नाही. पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र वेगवेगळ्या कर्जदारांशी संवाद साधीत असून ‘आम्ही बँकेत दिलेले सोने खरेच होते’ असे पोलिसांना सांगण्याचे सल्ले त्यांना देत आहे, मात्र पोलिसांना त्याचे ‘लोकेशन’ मात्र सापडत नसल्याचे सांगितले जाते यामुळे या प्रकरणात आता पोलिसही सहभागी झाले की काय? अशीही चर्चा आणि शंका निर्माण झाली आहे. ज्या बँकात बनावट सोने प्रकरणे उघड झाली त्यांनीही मौन बाळगले आहे. फक्त गुन्हा दाखल करून पोलिस गप्प बसले आहेत. पो नि भगवान मथुरे यांचे कामाची फारशी छाप पडली नाही. यामुळे या बनावट सोने तारण प्रकरणाची फाईल बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे
