पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु अनुदान तातडीने मिळावे – भास्कर पानसरे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिंदे – फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०रु सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही अनेक शेतकरी यापासून वंचीत आहेत. याबाबत सरकारने शेतकऱ्यांना वेठीस न धरता व त्यांच्याशी शाब्दीक खेळ न करता तातडीने उर्वरीत अनुदान द्यावे अशी मागणी घुलेवाडी गावचे माजी सरपंच व काँग्रेसचे कार्यकर्ते भास्कर पानसरे यांनी केली आहे
मात्र आता मे महिना सुरु असून अद्यापही अनेक शेतकरी या लाभापासून वंचीत आहेत .
सरकारने सानुग्रह अनुदान देण्याबाबत कोणत्याही जाचक अटी व शर्थी व घालता शेतकऱ्यांना वेठीस धरु नयेत शेतकरी अवकाळी पाऊस,महागाई,शेतमालाल भाव नाही अशा अनेक संकटांचा मुकाबला करीत असून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे .
सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने अंमलबजावणी करताना उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पानसरे यांनी केली आहे
