पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार – पंजाबराव डख
पिंपरणे नागापूरवाडी येथे पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
16 मे पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानात मोठी वाढ होणार आहे. तापमान जवळपास 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे निश्चितच नागरिकांना काळजी देखील घ्यावी लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे नागापूरवाडी येथे साईकृपा दूध संकलन केंद्राच्या वतीने बुधवार दि १० रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हवामान तज्ञ पंजाबराव डख होते यांनी हवामानाविषयी आपले अंदाज सांगितले यावेळी साईकृपा दूध संकलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रज्वल गुंजाळ यांनी शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर पशुवैद्यकीय मेडिकल सुरू केले या मेडिकल चे उद्घाटन प्रमुख पाहुणे पंजाबराव डख यांच्या हस्ते झाले
https://youtu.be/1vDhSVNixdo
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव गुंजाळ होते तर प्रमुख उपस्थितीत सागर गीते (गीते मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट) डॉ रमेश पताळे (पशु आहार व व्यवस्थापन तज्ञ),संदीप यादव ,बुवाजी बाबा पुणेकर (बुवाजी बाबा देवस्थान) बबन भूसाळ, नानासाहेब गुंजाळ आधीच अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता
पुढे बोलताना पंजाबराव डख म्हणाले की
वाढत्या तापमानामुळे राज्यात आता उकाडा वाढणार आहे. मात्र यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहणार आहे. 11 मे ते 16 मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार असून 17 मे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना शेतीची कामे 16 मे पर्यंत पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत. सध्या राज्यातील शेतकरी बांधव कांदा काढणी करत आहेत तसेच हळदीची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे लवकर करून घेणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे पुढल्या महिन्यात खरीप हंगामाची देखील सुरुवात होणार आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी आतापासूनच सुरू केली आहे.
डख यांनी यंदाच्या मान्सून बाबत देखील मोठी माहिती दिली आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात मान्सूनचे आगमन 8 जून 2023 ला अपेक्षित आहे. यानंतर राज्यात 23 जून पर्यंत सर्वत्र पाऊस पोहोचणार आहे.यावेळी साईकृपा दूध संस्थेच्या वतीने लकी ड्रॉ चे आयोजन केले होते
यावेळी लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस मिल्किंग मशीन दूध उत्पादक सोमनाथ कुदळ यांना मिळाले दुसरे बक्षीस चाफ कटर ते बक्षीस रवींद्र हळनर यांना मिळाले तिसरे बक्षीस पाच लिटर कॅल्शियमची किटली चैतन्य भवारी यांना मिळाली चौथे आणि पाचवे बक्षीस पंधरा लिटरच्या दोन घेतल्या हौशीराम खेमनर व तुळशीराम हळनर यांना मिळाल्याकार्यक्रमाचे सूत्र प्रास्ताविक प्रज्वल गुंजाळ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक संदीप डांगे यांनी केले
कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शुभम काळे संदीप म्हस्के, महेश म्हस्के यांनी यशस्वी प्रयत्न केले
