पानोडी घाटमाथा ते मांडवा सुरू असलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामासह ठेकेदाराची चौकशी व्हावी अन्यथा
रिपाईच्या वतीने वरवंडी फाटा येथे २० मे २०२३ ला रस्ता रोको आंदोलन !
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा शिर्डी ते पुणे ६७ क्रमांकाच्या राज्य महामार्गावरील पानोडी घाटासह कौठे – मलकापूर ते शिबलापूर पर्यतचा १४ किमीचा खड्डेमय व अरुंद रस्ताच्या कामाला ५ कोटी मंजुरी असताना ही दोन वर्षात रस्त्याच्या कामाला मुर्हुतचं मिळाळा नाही , प्रवाशांवर काय रस्ता , काय खड्डी , काय धूळ म्हणण्याची वेळ आली होती , विदयार्थासह प्रवाशाचे अंतोनात हाल झाल्यानंतर ठेकेदारासह बांधकाम विभागाला जाग आली काही काळानंतर धिम्म्यागतीने काम सुरु करत ते ही निकृष्ट दर्जाचे काम आता बस झाले बांधकाम विभागाचा अजब कारभार पानोडी घाट माथा ते मांडव्याच्या होणाऱ्या रस्त्याच्या कामासह ठेकेदाराची चौकशी व्हावी याकरिता पठार भागाती रिपाई कार्यकर्त्यानी तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्याकडे निवेदन देवून रिपाई पक्षाच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आवाज उठवावा त्यानुसार ठेकेदारासह निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी व्हावी अन्यथा वरवंडी फाटा येथे २० मे २०२३ ला रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिला .
राज्य महामार्ग क्र ६७ हा शिर्डी ते पुणे घोषित झाला बहुतांश रस्त्याचे रुंदीकरण झाले मात्र पानोडी घाटासह स्थापलिग घाट ते हनमंत नाका , शिबलापूर ते पानाडी घाट पायथ्यापर्यतच्या रस्ता दुरुस्तीस मुर्हुतचं सापडला नाही ! तालुक्यातील पुर्व भागावर राज्य पातळीवरील वजनदार दोन नेत्याचा वर चष्मा असताना सुद्धा मंजूर असलेला रस्ता दोन वर्षात दुरुस्त झाला नाही ! कौठे – मलकापूर येथे सुरु झालेल्या साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ निर्माण झाल्याने अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना व शालेय विदयार्थ्याना मोठा त्रास झाला . या रस्त्याकरिता लोकांच्या होणार्या अडचणी लक्ष्यात घेवून तत्कालिन बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी तातडीने ५ कोटी मंजूर केले . मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रस्त्याला बांधकाम विभागातील आधिकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे मुर्हुतचं सापडला नसल्याचे दिसून आले
हनुमंत नाका ते स्थापलिग घाट व शिबलापूर ते पानोडी घाट पायथ्यापर्यत १० किमी अंतर असून हा अत्यंत अरुंद रस्ता असून बहुतांश ठिकाणी रस्तेच्या कडेला कपारी निर्माण झाल्या असून मोठ – मोठ्या खड्डेच्या विळख्यात रस्ता सापडला होता संपूर्ण वरवंडी व परिसर धूळमय दिसत होती . पानोडी घाटाच्या पुढे मोटार सायकल व पायी प्रवाशांना प्रवास करताना अंगाला काटा उभा राहत असे . धूळमय रस्त्यामुळे आपघाताचे प्रमाण वाढत होते बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसले आजही शालेय विदयार्थी , प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यांना जीव मुठी घ्यावा लागला . तरीही बांधकाम विभाग या कामाकरिता का विलंब करत आहे हेचं कळनासे झाले आहे . पानोडी , वरवंडी , कौठे मलकापूर , खरशिदे , दरेवाडी , खांबे , ठाकरवाडी , कुंभारवाडी , चौधरवाडी आदि गावांतील लोकांना व प्रवाशांना मोठा त्रास होताना दिसत आहे तर अरुंद रस्त्यामुळे शालेय विदयार्थ्याना सायकल अथवा मोटार सायकल प्रवास करणे मोठे जिकिरीचे झाले असून अरुंद रस्ता असतानाही मोठ्या वाहनाचा वाहतुक जलद गतीने होताना दिसत असून आक्राळ – विक्राळ रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून हा रस्ता त्वरीत दुरुस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होताना दिसली . मात्र अडीज वर्षाच्या प्रदिर्घानंतर ( सत्ता बदल झाल्यानंतर ) घाईघाईने कामास सुरुवात केल्याने विजय मुन्तोडे , युवक तालुका अध्यक्ष योगेश मुन्तोडे , तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका सह सरचिटणीस नानासाहेब कदम, तालुका ज्येष्ठ उपाध्यक्ष रमेश भोसले, संपत भोसले, पठार भाग प्रमुख सागर शिंदे, संपत भोसले, नवनाथ भोसले, केरुनाथ भोसले ,शंकर भोसले, मराठा आघाडी तालुकाध्यक्ष गौतम वर्पे, भाऊसाहेब शिंदे, विजय वर्पे, दिनकर शिंदे, नंदू शिंदे, प्रवीण शिंदे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ही बाब रिपाईच्या तालुकाध्यक्ष शेळके यांच्या समोर निवेदनाद्रारे मांडल्याने त्यांनी त्वरीत निवेदन हे बांधकाम विभागास देवून ठेकेदार व रस्त्याची चौकशी मागणी केली .
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ५ कोटीच्या असणारे काम बड्या ठेकेदारांने बळकविले मात्र अडीज वर्ष लोकांना धूळ चारली , शिदे – फडणविस सरकार आल्याने ठेकेदारांनी घाईघाईने काम सुरु केले तेही निकृष्ट दर्जाचे तेव्हा या पानोडी घाट माथा ते मांडवे पर्यतच्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २० मे २०२३ रोजी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल .आशिष शेळके ( रिपाई ः तालुकाध्यक्ष संगमनेर )
