संगमनेर तहसील बिल्डिंगमध्ये २०१४ पासून विनापरवाना सुरु असलेल्या सेतू चालकांना १८ लाख ४७ हजार ४५६ रुपयांचा दणका
अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेर तहसील बिल्डिंगमध्ये विनापरवाना राजकीय आशीर्वादाने सुरु असलेल्या सेतू मधून विविध दाखले देताना मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात होते तसेच दाखले देताना अडवणूक केली जात होती, नागरिकांना अरेरावीची भाषा वापरली जात होती, वशिलेबाजी करून दाखले दिले जात होते तसेच काही दाखले प्रलंबित ठेवले जात होते.नागरिकांच्या सेतू बाबत शासन दरबारी अनेक तक्रारी होत्या परंतु स्थानिक राजकीय अडचणीमुळे महसूल अधिकारी आपले कार्य कर्तव्य विसरले होते. सेतू मधील मनमानी व लुट प्रकरणी काही नागरिकांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये अमोल खताळ यांच्याकडे पुरावेनिशी तक्रार केल्यानंतर त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत तहसील कार्यालय बिल्डींगमधील सेतू साठी वापरात असलेल्या जागा वापरण्यासाठी तहसीलदार संगमनेर यांच्याकडे परवानगी प्रत, भाडे करारनामा प्रत, किती वर्षापासून सुरु आहे अशी माहिती मागविली असता याबाबत कुठलाही करार, भाडे सेतू कडून घेतले जात नाही नसून एक प्रकारे ते विनापरवाना सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तहसील कार्यालय बिल्डिंग मधील सेतू ३०/११/२०२२ रोजी आदेशाने तात्काळ बंद करून सेतू हॉल मोकळा करून घेतला गेला. ९ ते १० वर्ष विनापरवाना जागा वापरली असल्यामुळे त्याचे भाडे तात्काळ वसूल करावे यासाठी अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या पाठ्पुरावामुळे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी शारदा पतसंस्था वाघापूर व APMCS Ltd महा ई सेवा केंद्र, गणेशनगर यांना ऑगस्ट २०१४ ते मार्च २०२३ पर्यंतचे तहसील कार्यालयाच्या बिल्डिंगमध्ये विनापरवाना चालविले गेलेले सेतूचे एकूण भाडे १८,४७,४५६ भरण्यासाठी कळविलेले आहे. संबंधित सेतू चालकांनी भाडे भरलेले नसल्यामुळे त्यांच्या कडून तात्काळ वसुली करावी अन्यथा २०१४ पासून २०२३ पर्यंत असलेल्या सर्व तहसीलदार यांच्या पगारातून भाडे रक्कम वसूल केले जावे. तसेच विनापरवाना सेतू सुरु आहे हे माहित असताना सुद्धा त्याला पाठबळ देणाऱ्या २०१४ पासूनच्या तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर शासकीय मालमत्ता गैरवापर होत असताना शासनाचे आर्थिक नुकसान केले प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी तक्रार अमोल खताळ पाटील लवकरच महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करणार आहे असे त्यांनी सांगितले.
