संगमनेरचे हायटेक बसस्थानक भुरट्या चोरांच्या विळख्यात
बसस्थानकातील पोलीसचौकी आहे एक भास
पोलीसचौकीत पोलीस कर्मचारीनसल्याने चोरट्यांना नाही कुणाचा धाक
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेरचे बस स्थानक म्हणजे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातही असे हायटेक बस स्थानक नसेल परंतु हे बस स्थानक कायमच समस्यांच्या विळख्यात सापडलेले आहे कधी प्रवाशांना भिकाऱ्यांचा त्रास, कधी अस्वच्छता आणि आता प्रवाशांना लुटीचे प्रकार घडत आहेत .एवढे सूसज्ज बस स्थानक असून त्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे प्रवाशांना विकत पाणी घ्यावे लागते. प्रवेशद्वाराजवळ बेसिस्त पार्किंग प्रवाशांना अडचणीची ठरत आहे या सर्व बाबींची जबाबदारी घेऊन बस स्थानकाचे अधिकारी सुधारणा करतील अशी अपेक्षा प्रवाशांना आहे
बस स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रभारी पोलीस उपाधीक्ष कांच्या हस्ते पोलीस चौकीचे ही उद्घाटन करण्यात आले मात्र त्या पोलीस चौकीत कधीच पोलीस कर्मचारी कधीच थांबत नसल्यामुळे या बसस्थानकामध्ये पाकीट मारणे आणि सोनसाखळी तसेच दागिने ओरबडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे यास खऱ्याअर्थाने पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे या बसस्थानकात असणारी पोलीस चौकीच केवळ शोभेचा बाहुलीच बनली आहे
पुणे नाशिक नगर यातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संगमनेर असल्यामुळे अद्यावत असे सुसज्ज आणि जिल्ह्यातील सर्वात मोठे बस स्थानक उभे राहिले आहे पुणे नाशिक या दोन शहरांना जोडणारा हाच मार्ग असल्यामुळे या दोन्ही मोठ्या शहरांकडे तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालु क्यात तसेच संगमनेर तालुक्याच्या सर्वच ग्रामीण भागात जाणाऱ्या सर्व बसेस याच संगमनेर बसस्थानकातून जात असतात त्यात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईअसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात या बसस्थानकावरती गर्दी होत असते या गर्दीचा फायदा घेत अनेकचोरटे भामटे महिलांचे दागिने ओरबडणे आणि प्रवाशांच्या पैशाची पाकिटे मारणे हेअसले प्रकार या बसस्थानकावर मोठ्याप्रमाणात सुरू आहे याकडे संगमनेर शहरपोलिसांचे मात्र अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे
संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या गळ्यातील दागिने, तसेच पर्स लांबविणेया सारख्या सातत्यपूर्ण घटना घडत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी अशा घटनाघडण्याची नेहमीच शक्यता असते त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असणार्या बसस्थानकातपोलीस चौकी निर्माण करून त्या ठिकाणीचोविस तास पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती असते मात्र संगमनेरचे बसस्थानक मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या स्थानकातपोलीस चौकीसाठी स्वतंत्र जागा तयार करून त्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने पोलीस चौकी उभारली आहे तिचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे मात्र त्या ठिकाणी कधीच पोलीस कर्मचारी थांबत नसल्यामुळे बस स्थानका मध्ये चोरट्यांचे चांगलेच फावले जातआहे
त्यामुळे याबस स्थानकातील पोलीसचौकी म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे
कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावीसंगमनेर शहराचा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी पोलिसांकडून विद्यार्थी आणि अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, त्यासाठी दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या आणि नियमित सोनसाखळ्य महिलांचे दागिने ओरबडणे तसेच पाकीट मार यासारख्या घटना घडूनही संगमनेरच्या बसस्थानका च्या पोलीस चौकीला मात्र कायमस्वरूपी पोलीस कर्मचार्यांची नेमणूक का करू शकले नाही असा संतप्त सवाल संगमनेर बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे
