भंडारदरातील इंग्रज काळातील कृष्णावंती विश्रामगृह अस्ता कडे

भंडारदरा परिसराती या दोन बंगल्यांची वाताहात झाली असुन या शासकिय मालमत्तेची अक्षरषः माती झाल्याचे दिसत

भंडारदरा / लोकवेध live न्यूज / संजय महानोर

अकोले तालुक्यातील भंडारदरा परीसरातील विश्रामगृहांची अवस्था अतिशय दयनिय झाली असुन ही विश्रामगृहे शेवटची घटका मोजत आहे .
सविस्तर वृत्त असे भंडारदरा परीसरात भंडारदरा धरण शाखेच्या आवारामध्ये दुय्यम श्रेणीचा बंगला तसेच त्यांच्याच अखतारीत असणारा कृष्णावंती हे दोन बंगले आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेवटची घटका मोजत आहेत . भंडारदरा धरण शाखेच्या आवारामध्ये असणारा दुय्यम श्रेणीचा बंगला ब्रिटीशकालीन असुन ब्रिटीशांनी त्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणुन भंडारदरा धरण निर्मितीच्यावेळेस उभारला गेला होता . काही वर्षापुर्वी या बंगल्याच्या परिसरात हिरवळीचे साम्राज्यच पसरलेले होते . हिरवीगार झाडे डोलाने डोलत होती .

या ठिकाणी शासकीय अधिकारी बरोबरच राजकिय क्षेत्रातील व्यक्तींचाही राबता होता . पंरतु ‘ वडार ‘ नामक भंडारदरा धरणाचे असणारे शासकिय अधिकारी येथुन बदलुन गेले आणि या बंगल्याला उतरती कळा लागली . हा बंगला अगदी मोडकळीस आला असुन बंगल्यांच्या काही भिंती मोडकळीस आल्या आहेत तर काही भिंती गायब सुद्धा झाल्या आहे . बंगल्याच्या छतावर असणारे कौलेही गायब झाली आहेत .तर बंगल्यामध्ये असणा-या फर्निचरचीही सोयीस्करपणे विल्हेवाट लावल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे . आज हा बंगला म्हणजे साक्षात भुतबंगला वाटत असुन बंगल्याच्या अवतीभोवती कायमच मद्यपींचे वास्तव्य असल्याचे दिसुन येत आहे .
अशाच पद्धतीची अवस्था कृष्णावंती या बंगल्याची झाली असुन हा बंगला म्हणजे भंडारद-याची शान समजली जात होती . या बंगल्यावर कायमच निरनिराळ्या राजकीय व्यक्तींची उठबस होती . एका बाजुने प्रवरामाई , पाठीमागच्या बाजुने भंडारदरा धरण तर बंगल्याच्या समोरुन वाघमोडी आकाराचा वाहता असणारा डांबरी रस्ता . या बंगल्याच्या बुकींगसिठी चढिओढ लागलेली असायची . अगोदर या बंगल्याचा ताबा घाटघर उंदचन प्रकल्पाकडे होता . त्यानंतर हा बंगला भंडारदरा धरण शाखेच्या ताब्यात देण्यात आला .आज या बंगल्याची अवस्था असुन नसल्यासारखी झाली . बंगल्याच्या भोवती काटेरी झुडुपांनी आपले बस्तान बसविले आहे .तर बंगल्याच्या आवारात श्वापदांची कायमच रेलचेल असल्याचे दिसुन येत आहे . बंगल्यातील फर्निचर गायब झाले आहे . खिडक्यांची तावदाने कुठे गेली , हेच समजायला मार्ग दिसत नाही . अशा भंडारदरा परिसराती या दोन बंगल्यांची वाताहात झाली असुन या शासकिय मालमत्तेची अक्षरषः माती झाल्याचे दिसत . दोन्ही बंगले व्यवस्थित रिपेअर केले गेले किंवा बांधा आणि वापरा या स्किमखाली कुणाला दिले गेले तर निश्चित या बंगल्यांना पुन्हा पुर्वीचे वैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!