मुळाकाठच्या उपोषनास माझा पाठिंबा ;  वाळूच्या एकही खड्याला हात लावू देणार नाही -आमदार गडाख
अहमदनगर / पानेगांव : लोकवेध live न्यूज 
नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील अंमळनेर येथे मुळा नदीतून उत्खनन करुन डेपो निंभारी येथे करण्याचा जो शासनाने घाट घातला असून हे उत्खनन तसेच डेपो त्वरित रद्द करावा यासाठी मुळाकाठच्या गावांनी शासनाच्या विरोधात उपोषण अंमळनेर करजगांव रस्त्यावरील लक्ष्मी काॅर्नर येथे सुरू केले असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांनी उपोषणास्थळी भेट देवून उपोषण कर्त्यांना लोकप्रतिनीधी या नात्याने पाठिंबा देवून तुमच्या मागं ठाम उभा असून मुळा नदीपात्रातील एक खडा हि उचलू देणार नसून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर अख्खा तालुका आंदोलन कर्त्यांचा मागं उभा करेल असं आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. मुळाकाठच्या ह्या गावतील अंमळनेर निंभारी खुपटी तिळापूर इमामपूर वांजूळपोई करजगांव वाटापूर पानेगांव मांजरी खेडलेपरमानंद शिरेगांव वाटापूर पाचेगांव आदी गावातील सरपंच शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषण कर्त्य संपत किशन पवार वय – ७६ तब्येत खालावल्याने अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. आजच्या तिसऱ्या दिवशी परीसरातील गांव बंद आंदोलन तसेच रास्तारोको करण्यात आला. चौथ्या दिवशी महिला रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होवून आंदोलन करण्यात येणार आहे. प्रवरेचा तिरी असणारं पाचेगांव येथे आंदोलनला पाठिंबा म्हणून निषेध सभा घेवून गांव बंद ठेवण्यात आले. आम आदमी पार्टी नेवासा स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्तीच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. प्रशासनाच्या वतीने उपोषणास्थळी नगर उपविभागीय प्रांताधिकारी सुधिर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके, नेवासा तहसीलदार डॉ संजय बिरादार नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि शिवाजी डोईफोडे, राहुरी पोलीस ठाण्याचे पो.नि मेघश्याम डांगे पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव चौधरी उपनिरीक्षक थोरात, आरोग्य विभागाचे जावळे अहमदनगर दंगल नियंत्रण पथक सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. प्रतिक्रिया – मुळाकाठच्या शेतकऱ्यांन मागे ठाम उभा असून तातडीने अंमळनेर निंभारी येथील वाळू डेपो तसेच उत्खनन रद्द करावे व प्रशासनाने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील जनता आक्रमक भूमिका घेतील – माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील प्रतिक्रिया – शेतकऱ्यांचा प्रश्नांनवर राजकारणं विरहित मुळाथडी परीसरातील सर्वच गांव एकवटले असून एक हि खडा वाळूचा उचलू न देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.- पानेगांवचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले करजगांव माजी सरपंच अशोक टेमक, लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर अंमळनेर निंभारी सरपंच अप्पासाहेब जाधव तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!