संगमनेरातील व्यापारी गेली अनेक वर्ष भागवित आहे बस स्थानकातील प्रवाशांची तहान
दिवसभर हजारो तहानलेले प्रवाशी व्यक्ती फिल्टर युक्त थंडगार पाणी प्यायल्यावर समाधानाने कृतज्ञता व्यक्त करत आहे
संगमनेर / लोकवेध live न्युज /सुभाष भालेराव
कडक उन्हाळ्यात तहानलेल्या जीवांना विनामुल्य पाण्याची सुविधा देणे म्हणजे पाणपोई,
उन्हाची तीव्रता वाढली असून आता शरिराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे. कामानिमित्त रणरणत्या उन्हात बाहेर पडलेल्या तहानलेल्या जीवांना पाणपोईचा गारवा मिळतो आहे.उन्हाळा लागला की अनेक संस्था आणि मंडळे मोफत पाणपोईचा सेवाभावी उपक्रम सुरु करतात. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील शहरातील ठिकठिकाणी पाणपोयी सुरु झाल्या आहेत.
अतिशय कडक उन्हाळा आणि त्यात लग्नसराई असल्यामुळे संगमनेर बस स्थानकात दिवसभरात हजारो महिला पुरुष लहान मुले व प्रवाशांची ये जा सुरू असते परंतु या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अतिशय गंभीर समस्या होती संगमनेर व्यापारी असोसिएशन याची दखल घेत बस स्थानकात पाणी सुरू केली त्यामुळे राज्यातून येणाऱ्या तसेच संगमनेर तालुक्यातील प्रवाशांची पाण्याची गैरसोय दूर झाली
थंडगार फिल्टर युक्त जार मधील पाणी पिऊन तृप्त होऊन नकळत तोंडातून आशीर्वादाची शब्द निघतात दुपारच्या वेळी तहाण भागविण्यासाठी पाण्याची शोधाशोध होते. परंतु या पाणपोईमुळे बसस्थानकात येणाऱ्यांची तहाण भागते आहे.तहानलेली व्यक्ती त्या फिल्टर युक्त थंडगार पाणी प्यायल्यावर समाधानाने कृतज्ञता व्यक्त करत आहे
माणुसकीचा धर्म बाटलीत बंद झालातहनलेल्या प्राण्याला संत एकनाथानी शुर्चुभूत असतेवेळी पाणी पाजल्याचे उदाहरण सर्वश्रृत आहे. यावरून तहानलेल्या जीवाची तहानभाग विणे हे पुण्य कर्म असल्याची शिकवण मिळते. प्राचीन काळापासून उन्हाळ्यात नागरी वस्तीच्या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था स्वखर्चाने दानशूर व्यक्ति किंवा सामाजिक संस्थांक डून करण्यात येत होती.थकलेला तहानलेला पाणपोईमधील पाणी पिऊन तृप्त होत असे. मात्र मागील काही वर्षात हा माणुसकीचा धर्म बाटलीत बंद झाला आणि त्याला व्यापाराचे रूप आले आहे.
पाणीसुद्धा महाग झालेअलिकडच्या काळात पिण्याच्या पाण्याचे उद्योगात रूपांतर झाले आहे .फिल्टरचे बाटलीबंद पाणी सर्वत्र मिळत आहे. त्यामुळे पाणपोई विस्मृतीत गेल्या आहेत. मात्र रस्त्याने फिरणार्या भटक्या लोकांना, अतिगरिबांना बाटली बंद वीस रुपयांना मिळणारे पाणीसुद्धा महाग झाल्याने तहान भागवणे त्यांना अशक्य असल्याचेही अस्वस्थ करणारे वास्तव आहे.
