हर्सल टी पॉईंट येथे तथागत गौतम बुद्धांचा पुतळा बसवा, नाहीतर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही – आंबेडकरवादी संघर्ष समितीचा इशारा.

लोकवेध live न्यूज 

हर्सल टी पॉईंट येथे तथागत गौतम बुध्दाचा पुतळाच बसवावा याबाबत मनपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत. मा. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय. व मुख्यमंत्री सचिवालय (कक्ष) यांना आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
सदरील मागणी पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

औरंगाबाद हे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ असून लगतचा परिसर व जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात अजिंठा, वेरुळ व इतर ठिकाणी बुध्द लेणी असून त्या बघण्यासाठी जगभरातून बौध्द व इतर पर्यटक मोठया प्रमाणात येतात. त्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होत आहे. औरंगाबाद शहर व जिल्हयाला पर्यटन स्थळाचा ऐतिहासिक वारसा लाभला असून बुध्द लेणीमुळे बौध्द राष्ट्राकडून सदरील पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी मिळत असतो, म्हणून हर्सल टी पॉईंट येथे आंबेडकरी व बौध्द समाजाच्या वतीने तथागत गौतम बुध्दांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने आपल्या प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

यापुर्वीही समितीच्या वतीने सदरील मागणी मान्य करण्यात यावी, याकरीता लोकशाही मार्गाने आंबेडकरी व बौध्द समाजाकडून जनआंदोलन करण्यात आलेले आहे. परंतू, सदरची मागणी अद्यापही मान्य झाली नसून त्या मागणीशी आमची अस्मिता व भावना जोडली आहे.
तसेच अलीकडे औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे कार्यक्रमासाठी आल असता एक निवेदन त्यांना दिल्यावरुन राजमाता माँ जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हर्सुल टी पाँईट येथे बसविण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केल्याने आंबेडकरी व बौध्द समाजामध्ये असंतोष पसरला आहे.

मा. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली घोषणा ही निषेधार्ह असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आहे. आम्हाला राजमाता माँ जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल नितांत आदर आहे. याबरोबरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई यांचा सदर ठिकाणी पुतळा बसविण्याची घोषणा केली असती तर आम्ही त्याचे स्वागत केले असते. परंतू, सर्वप्रथम तथागत गौतम बुध्दाच्या पुतळयाची मागणी असतांना राजकीय डावपेच म्हणून आंबेडकरी व बौध्द समाजाच्या भावना मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दुखावल्या आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. त्यांनी या मागणीचा फेरविचार करुन जागतिक वारसा असलेल्या बौध्द संस्कृतीचा ठेवा म्हणून हर्सुल टी पॉईंट येथे तथागत गौतम बुध्दाचा पुतळाच बसविण्याबाबतची घोषणा करावी,

नाहीतर आंबेडकरी व बौध्द समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात येत आहे. या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून व आंबेडकरी व बौध्द समाजाच्या भावना समजून आमची मागणी पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी.

निवेदन देताना श्रावणदादा गायकवाड. सुनील वाकेकर. नानासाहेब शिंदे. वसंतराज वक्ते. किशोर गडकर. मनीष नरवडे. मिलिंद मोकळे. संतोष मोकळे. संगीताताई भालेराव /जाधव करुणा ताई पाईकडे.बलराज दाभाडे. उत्तम जाधव. नायबराव दाभाडे. राहुल वाडमारे. बाळु वाघमारे. पवन पवार. सुनील अवचरमल. सुनील खरात. नवल सूर्यवंशी. अंकुश शिंदे. बंटी सदाशिवे. राहुल मकासरे. अशोक सोनवणे. सूरज खाडवे. कांतीलाल सोनवणे. भगवान तरटे. प्रवीण बोर्डे. विशाल गवळे. विजय पवार. संदीप अहिरे. सुनील आंबोरे. संजय जाटवे. सुरेश कटारे. लाला बताडे. विलास साळवे. किशोर ससाणे. सचिन गायकवाड. विशाल मोरे. संजय शिरसाट. अक्षय जिनवाल. प्रकाश घोरपडे. सोनू गायकवाड. अलंकार खंडागळे. अमोल भालेराव. सूरज मगरे. राजू म्हस्के. विशाल बनकर. बाबासाहेब सुरडकर. अमोल घोरपडे. करुणा पाटोळे. भारती बनकर. शालिनी नरवडे. आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!