बालसुधार गृहातही मुले असुरक्षित ;बालसुधार गृहातून नऊ वर्षाच्या मुलास पळविले
संगमनेर शहरातील घटना
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरातील बाल सुधारगृहातून एका नऊ वर्षाच्या मुलाचे अनोळखी व्यक्तीने पळून नेले. ही घटना काल दि. २० मे ला सांयकाळी घडली.
सविस्तर माहिती अशी की संगमनेर शहरातील बाल सुधार गृहात कृष्णा माळी हा विद्यार्थी राहत होता. परंतु दि. 20 रोजी सायंकाळी कृष्णाला कुणीतरी पळून नेल्याचे समजले या संदर्भात बालसुधारगृहातील बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी शहर पोलिसांत रविवारी फिर्याद दिली असून, तक्रारीच्या आधारे अनोळखी व्यक्ती विरोधात शहर पोलिसात भादंवि कलम ३९६, ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात बालसुधारगृहाचे आंबरे यांनी या मुलाला आई वडील नसल्याने त्याच्या काकाने एका मेंढपाळाकडे दिल्याची माहिती दिली, कृष्णा माळी रस्त्याने चालत असताना
पारेगावचे पोलीस पाटील दादासाहेब तुकाराम मोकळ यांना दिसला. त्यांना संशय आल्याने त्यांनी या बालकास संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.
तालुका पोलीस जाधव यांनी ३ मे रोजी या बालकास बालसुधारगृहात दाखल केले होते. पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
