संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या अवयवांची विक्री ; वनविभागाची मोठी कारवाई दोघांना रंगेहात
पकडलं तर एक जण फरार
चंदनापुरीतील आनंदवाडी येथील घटना
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या अवयवांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वन खात्याला मिळालेली होती.  शुक्रवारी तालुक्यातील चंदनापुरी येथील आनंदवाडी परिसरात बिबट्यांचे दात, सुळे, मिशा यांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वन खात्याला मिळाली.
बिबट्यांचे मृगया चिन्ह, दात, सुळे, मिशा यांची बेकादेशीर विक्री करताना वनखात्याच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडल्याची घटना शनिवारी तालुक्यातील चंदनापुरी परिसरात घडली. तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला
बिबट्यांच्या अवयवाची विक्री होत असल्याची खातरजमा करण्यासाठी वन खात्याच्या पथकाने सापळा रचला रचला. या पथकातील कर्मचारी बनावट ग्राहक बनुन आनंदवाडी येथे संबंधित आरोपींना भेटले. हे आरोपी या पथकाच्या जाळ्यात अलगद अडकले.
बिबट्यांच्या अवयवांची विक्री केल्याप्रकरणी वन खात्याने श्रीराम यादव सरोदे (वय ३४), सुधिर विजय भालेराव (वय ३०) अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून, सुशांत उत्तम भालेराव (फरार आरोपी) सर्व राहणार (आनंदवाडी), ता. संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी संदिप पाटील आणि उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते व योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. वनपरिक्षेत्र संगमनेर भाग-१ चे श्री. सचिन लोंढे, वनविभाग जुन्नर व W.C.C.B यांची टिम, रईस मोमिन, संदिप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हारुन सव्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार यांनी कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!