साकुर मध्ये महिलेचा विनयभंग , नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल
साकुर / लोकवेध live न्यूज 
 साकुर येथे घरी आलेल्या दोन
जावांमधील झालेल्या  वादाची ठिणगी थेट विनयभंगा पर्यंत गेली  नवरा-बायकोने  महिलेला मारहाण करीत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत तिचा विनयभंग केला या वादामध्ये महिलेच्या बोटालाही चावा घेऊन तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. सदर संगमनेर तालुक्यातील  साकुर येथे गुरुवारी हा प्रकार घडला. पीडित महिला आपल्या पतीसह पतीच्या नोकरी निमित्ताने चिंचवड पुणे येथे रहावयास आहे. अधून मधून कुटुंबीयासह पीडित महिलेचे आपल्या पतीच्या गावी साकुर येथे येणे-जाणे असते. साकुर येथील घरी महिलेचा दीर आपल्या कुटुंबीयासह रहावयास आहे. गावाकडे आल्यानंतर हे सर्वजण एकत्र राहत असत.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे पती बाहेरून येताना श्रीखंड घेऊन आले होते. पीडित महिलेचा मुलगा आणि पुतणी श्रीखंड खात असताना तेथे आलेल्या जावेने तिच्या मुलीस उद्देशून, आपण भिकारी आहोत का? तू त्यांचे श्रीखंड का खाते? त्यांना तिकडे खायला मिळत नाही, म्हणून ते इकडे येतात. असे म्हणून पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडित महिलेने आपल्या जावेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
दोघींमध्ये वाद सुरू असताना पीडित महिलेच्या दिरानेही आपल्या भाऊजयीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलेने दोघा नवरा बायकोला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिराने आपल्या भावजयीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला पाय धरून ओढत बाथरूमकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने प्रतिकार केला असता, दिराने आपल्या भाऊजईच्या बोटाला चावा घेत मारहाण केली. तसेच तिला झटू लागला या झटापटीत तिचे कपडे फाडत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी मधे पडलेल्या आपल्या भावालाही म्हणजेच पीडित महिलेच्या पतीलाही मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात तिच्या दिर आणि जावेविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 325, 354, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. एम. चौधरी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!