गगनगिरी महाराजांच्या चरणी विखे पाटलांची प्रार्थना : अल निनोचे संकट दूर होऊन भरभरून पाऊस पडू दे”

“नामसप्ताहातून पावसासाठी सामूहिक साकडे; विखे पाटील म्हणाले – गगनगिरी महाराज कृपेने संकट टळो”

“लाखो भाविकांच्या साक्षीने पावसासाठी प्रार्थना; गगनगिरी सप्ताहात विखे पाटलांचे भावनिक आवाहन”

 

संगमनेर 

“अल निनोचे संकट घालव अन् भरपूर पाऊस पडू दे”आशी प्रार्थना विश्वगौरव प.पू.गगनगिरी महाराजांच्या चरणी आहे.लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार्या नाम सप्ताहाचे रुपांतर चांगल्या पावसात होवू दे आशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्रैवार्षिक अखंड हरीनाम सप्ताहाला शुभेच्छा दिल्या.

तालुक्यात गुंजाळवाडी येथे पं.पू.स्वामी गगनगिरीजी महाराज भक्त परिवाराचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भाविकांशी संवाद साधला.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचे वाढदिवसाच्या निमिताने अभिष्टचिंतन करण्यात आले.खा.राजाभाऊ वाजे आ.अमोल खताळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिक मासाच्या निमिताने आयोजित केलेल्या सप्ताहाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल गगनगिरी महाराज भक्तपरिवाराचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,या नाम सप्ताहातून आपण चांगला पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करावी.

मागील वर्षी मे महीन्यात पाऊस सुरू झाला होता.यंदा जून महीना संपला आला तरी पाऊस नाही.अल निनोच्या संकटाचा मोठे संकट सांगितले आहे.त्यामुळे धरणातील पाणी साठे आरक्षित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.सिंचनाचे सर्व आवर्तन थांबविण्यात आले असून सर्व पाणी ३१ आॅगस्ट पर्यत राखून ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार अमोल खताळ पाटील यांचा सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि आयोजक आबासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!