या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाली निकालापूर्वीच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी

अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

गुणवत्ता व उत्कृष्ट निकालाच्या परंपरेसह यूजीसी चे नेक मानांकन आणि आयएसओ अवॉर्ड मिळालेल्या अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच चांगल्या पॅकेजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ बी. एम. लोंढे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर लोंढे म्हणाले की माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने आपल्या गुणवत्तेचा लौकिक जपला असून या महाविद्यालयातून 2286 विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली आहे. यामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे.

यावर्षी विविध कंपन्यांनी संस्थेत येऊन घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यू मधून 45 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे यामध्ये आयसीआयसीआय बँक , विवंता ताज हॉटेल पुणे , लॉंग चेक कंपोझिट इंडिया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सोलुशन, इन्फोसिस लिमिटेड, इन्स्पायर कम्प्युटर्स, ए बी के इम्पोर्ट लिमिटेड ,एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, डेसिमल पॉईंट सोल्युशन, इंडिया मार्ट ,मालपाणी ग्रुप यांसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.

अमृतवाहिनी एमबीएला नेकचे मानांकन मिळाले असून संस्थेच्या गुणवत्तेमुळे व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी संशोधन केंद्र ही कार्यरत असून यामधून 27 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहे .ग्रंथालय, अत्याधुनिक इमारत, क्रीडांगण ,प्लेसमेंट सुविधा ,होस्टेल ,निसर्गरम्य वातावरण यामुळे संस्थेला विविध पुरस्कारांसह या वर्षीचा बेस्ट इमर्जिंग इन महाराष्ट्र हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट कामी विभाग प्रमुख डॉ. नितीन भांड यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. महसूलमंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात , मा.आ डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा व्ही बी धुमाळ  यांचे सह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!