पेटीट जुनियर कॉलेजचा इयत्ता १२वीचा निकाल ७९.६०%

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी .एम पेटीट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा फेब्रुवारी – मार्च 2023 एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल ७९.६०% लागला आहे. कला , वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा मधून १५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १२१ विद्यार्थी पास झाले आहे. शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे –

विज्ञान शाखा ९२.२२% वाणिज्य शाखा – ६८.९६% कला शाखा – ५४.५४% विज्ञान शाखेत सोनवणे ओंकार राजू ८०.३३ (प्रथम) , देशमुख श्रेया किशोर ७८.६७ (द्वितीय), रोडे तेजस दत्तात्रय ७६.३३ (तृतीय) वाणिज्य शाखा – कर्पे ज्ञानेश्वरी शिवाजी ६५.५० (प्रथम) , बछिडे श्रावण विनायक , हासे तनवी नितीन ६२.६७ (द्वितीय) , साबळे वृषाली बारकू ६१.१७ ( तृतीय) कला शाखा – साळवे अक्षय राजू ५८.८३ ( प्रथम), हांडे ओंकार मनोज ५७.८३ (द्वितीय), शेख अमन मोहम्मद ५४.५० (तृतीय) हे विद्यार्थी शाखा निहाय महाविद्यालयात गुणानुक्रमे प्रथम ,द्वितीय ,तृतीय आले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सर डॉ. मो .स गोसावी , विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी , एच आर डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे , अधीक्षक प्रा. वैभव सरोदे , प्राचार्य एच .आर मोकळ, पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड , वरिष्ठ लिपिक सतीश चंदन , सागर पाचोरकर , प्रा. भाऊसाहेब मांढरे , प्रा परेश सांगवीकर , प्रा श्रीमती एस व्ही शिंदे , प्रा. सुशीला चिमणकर , श्री सांगळे के .के , संतोष धुळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!