प.पु.गगनगिरी महाराज विद्यालयाच्या वतीने प्रांताधिकारी श्री.शैलेश हिंगेसाहेबांचे स्वागत व सत्कार
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील गगनगिरी महाराज विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक मंडळ व प्राचार्य शिक्षक शिक्षक यांच्यावतीने प्रांताधिकारी श्री.शैलेश हिंगेसाहेब यांची सदिच्छा भेट घेतली व परमपूज्य गगनगिरी महाराज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा.बापूसाहेब देशमुख व कमिटीच्या हस्ते त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष मा. डी.एम.देशमुख सचिव मा.श्री कैलासशेठ काळे अँड.राहुल देशमुख प्राचार्य मुकुंद डांगे सर यांनी ही साहेबांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बापूसाहेब देशमुख यांनी सामाजिक राजकीय तसेच भौगोलिक माहिती देत परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली ग्रामीण भागात एक यशस्वी विद्यालय निर्माण करून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात गगनगिरी विद्यालयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे साहेब यांनी विद्यालय विषयी माहिती जाणून घेऊन विद्यालयाला भेट देण्याची मनीषा व्यक्त केली गगनगिरी विद्यालयाच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब देशमुख व कमिटीने
आपल्या शैक्षणिक संकुलास भेट देण्याचे निमंत्रणही दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!