विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जगातील स्पर्धेला सामोरे जावे – मा.आ डॉ  तांबे
सह्याद्री जुनिअर कॉलेजचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

कॉमर्स शाखेचा १०० टक्के निकाल !

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालामध्ये भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनिअर कॉलेज ने घवघवीत यश संपादन कॉमर्स विभागाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. संगमनेर शहर हे गुणधर्म गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनले असल्याचे गौरव उद्गार माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले आहे

प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य प्रा. एम वाय दिघे, उपप्राचार्य जी. एम. डोखे, इन्चार्ज प्रा सुरेश घोरपडे, सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन प्रा. गणेश गुंजाळ, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अमोल दातीर तसेच कॉलेज चे सर्व प्राध्यापक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
बारावी बोर्ड परीक्षेमध्ये भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनिअर कॉलेज चा निकाल ८९.०८ टक्के लागला असून, कला शाखा ६९.४६ टक्के, वाणिज्य शाखा १०० टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९४.३२ टक्के लागला आहे. कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी गायत्री गुंजाळ हिने १२.५० टक्के मार्क्स मिळवत सह्याद्री जुनिअर कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकविला.

आर्ट्स मध्ये प्रथम क्रमांक रेणुका राउत ८५.५० टक्के, द्वितीय क्रमांक प्रगती गोपाळे ७९.१७ टक्के, तृतीय क्रमांक विठ्ठल वाखारे ७५.६७ टक्के, चतुर्थ क्रमांक दिव्या आरोटे ७२.६७ टक्के व पाचवा क्रमांक धनश्री जोर्वेकर ७१.१७ टक्के तसेच कॉमर्स मध्ये प्रथम क्रमांक गायत्री गुंजाळ १२.५० टक्के, द्वितीय क्रमांक सार्थक सस्कर • ९२.१७ टक्के, तृतीय क्रमांक जिया शेख ९१.६७ टक्के, चतुर्थ क्रमांक सुमित खतोडे ९०.०० टक्के व पाचवा • क्रमांक अंबिका सब्बन ८८.३३ टक्के तर सायन्स मध्ये प्रथम क्रमांक ओमकार गोडसे ९०.६७ टक्के, द्वितीय क्रमांक ऋतुजा ढोकरे ८७.१७ टक्के. तृतीय क्रमांक आदित्य दराडे ८५.०० टक्के, चतुर्थ क्रमांक सिद्धी घोरपडे • ८४.०० टक्के व पाचवा क्रमांक साक्षी गुंजाळ ८३.५० टक्के मिळाले आहेत

यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनले आहे. सह्याद्री संस्थेने आपला उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखताना परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जगातील स्पर्धेला सामोरे जावे असे आवाहन ही त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मच्छिंद्र दिघे यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे ,कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!