प्रा. गुलाब गायकवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार प्रदान
संगमनेर – लोकवेध live न्यूज
शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटीट कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज तथा हिंदी विभाग प्रमुख व अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे सचिव प्रा. गुलाब गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ द्वारा दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार नुकताच बारामती येथे झालेल्या दोन दिवशीय अधिवेशनात ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी आय पी ओ एस पांडुरंग चोरमले , संघाचे राज्याध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे , कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे , सचिव प्रा. रेवननाथ कर्डिले आदींसह संघाचे सर्वच पदाधिकारी , तसेच राज्यातील विविध विभागातून आलेले हिंदी अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. गायकवाड यांनी अध्यापनाव्यतिरिक्त राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी विविध विद्यालयात ,महाविद्यालयात जाऊन हिंदी राष्ट्रभाषेवर व्याख्याने दिलेली आहे. हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी त्यांचे नेहमीच विविध उपक्रम विद्यालयात सुरू असतात. प्रा. गायकवाड यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रा.गायकवाड यांना आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो.स गोसावी , अध्यक्ष एस बी पंडित. एच आर डायरेक्टर डॉ.दीप्ती देशपांडे , विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी , अधीक्षक प्रा. वैभव सरोदे , हिंदी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश म्हसे , प्राचार्य एच आर मोकळ, पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे. प्रा. गायकवाड यांना आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षणप्रेमी नागरिक व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
