दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळते याचा आनंद – आमदार थोरात
दुष्काळी जनतेच्या शेतात पाणी मिळाले तो स्वप्नपूर्तीचा दिवस
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अनेक अडचणीवर मात करून आपण निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. काम कोणी केले हे जिल्ह्यासह राज्यातील सर्व जनतेला माहित आहे. सरकार बदलले आणि नशिबाने त्यांना कालव्यांची चाचणी घेण्याची संधी मिळाली. हे धरण व कालव्यांसाठी केलेले कष्ट मोठे असून या कष्टानंतर दुष्काळी जनतेला पाणी मिळते आहे. याचा आपल्याला आनंद आहे. सर्व दुष्काळी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल तो आपल्या जीवनातील स्वप्नपूर्तीचा दिवस असेल असे प्रतिपादन निळवंडे धरणाचे जनक तथा मा महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याच्या चाचणीनंतर ते म्हणाले की, हा माझ्यासह सर्व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे. 1999 मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपण निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राबवून प्रकल्पग्रस्तांना संगमनेर तालुक्यात चांगल्या जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये चांगल्या नोकऱ्या दिल्या . काम तातडीने होण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन भिंतीचे काम पूर्ण केले. याचवेळी कवठे कमळेश्वर, गणेशवाडी, पिंपळगाव कोंझिरा या मोठमोठ्या बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्णत्वास आणली. मात्र 2014 ते 2019 या काळात कामे थंडावली होती.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येतात मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवली. कोरोना महामारीतही हे काम अविरतपणे सुरू होते. ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. त्यासाठी विविध प्रश्न सोडवत जलद गतीने काम केले. आपण काम केले पण कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही.
काम अंतिम टप्प्यात आले असताना सरकार बदलले. नशिबाने त्यांना चाचणी घेण्याची संधी मिळाली. हा प्रश्न श्रेय वादाचा विषय नसून दुष्काळी जनतेला पाणी मिळते आहे याचा आनंद आहे . सध्या भंडारदरा आणि निळवंडे धरण मिळून 10 टीएमसी पाणी शिल्लक आहे. चाचणी घेतली नसती तर हे पाणी वाया गेले असते. म्हणून आपण 23 मे 2023 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे आनंददायी आहे
तरीही 182 गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल तो आपल्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असेल असे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
धरणाचे जनक आ. थोरात यांच्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण.
या धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांनीच मोठे काम केले . धरणग्रस्तांना मोठा सन्मान दिला. जमिनी मिळून दिल्या. आणि त्यांना सरकारी संस्थांमध्ये चांगल्या नोकऱ्या दिल्या.फक्त राजकीय उद्देश ठेवून धरणातून पाणी सोडण्याच्या चाचणीचा झालेला कार्यक्रम असल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून आमदार थोरात हे आज कार्यक्रमात हवेत होते त्यांच्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे
182 गावातील शेतकऱ्यांनी दर्शवली नाराजी
निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सुटते आहे याचा आनंद सर्वांना आहेच. परंतु यावेळी ज्यांनी अथक परिश्रम केले. या कामासाठी पाठपुरावा केला. आणि ज्यांच्या माध्यमातूनच धरण आणि कालवे पूर्ण झाले ते धरणाचे जनक आमदार बाळासाहेब थोरात यांना सरकारने डावल्याने १८२ गावातील शेतकऱ्यांनी सोशल माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
