पेटीट विद्यालयाचा दहावीचा निकाल ८७.७१%
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटीट विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८७.७१ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य एच आर मोकळ यांनी दिली आहे . विद्यालयात गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – कु. गवांदे गायत्री संजय ८२.४० (प्रथम) , शिंदे मंगेश चंदर ७९.४० (द्वितीय), हरनामे अंजली संदीप ७०.८० (तृतीय). पेटीट विद्यालयात गरीब , होतकरू व परिस्थितची जाणीव असणारे विद्यार्थी प्रवेश घेतात. अशाही परिस्थितीत नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेल्या पेटीट विद्यालयाचा निकाल खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यालयात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स गोसावी , अध्यक्ष प्रिन्सिपल एस बी पंडित , एच आर डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे , विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी , प्रा. वैभव सरोदे ,अधीक्षक डॉ. अस्मिता देशपांडे , प्राचार्य एच आर मोकळ यांनी अभिनंदन केले आहे.
