परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाचा 92 टक्के निकाल
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 92.00
टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य मुकुंद डांगे यांनी दिली आहे .
परीक्षेला बसलेले विद्यार्थी 81
उत्तीर्ण विद्यार्थी 75
विशेष प्राविण्यसह (डिस्टिंक्शन) 9
प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) 34
सेकंड क्लास 26
विद्यालयात गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –
प्रथम क्रमांक- राहणे पूर्वा वाल्मीक 85.60%
द्वितीय क्रमांक- बागुल काजल गुलाब 84.40%
तृतीय क्रमांक- कांगणे समीक्षा अमोल 81.60%
चतुर्थ क्रमांक- देशमुख ओंकार महेश 81.00%
पंचम क्रमांक- गोसावी साक्षी विनायक 78.40%
गगनगिरी महाराज विद्यालयातील विद्यालयात गरीब , होतकरू व परिस्थितची जाणीव असणारे विद्यार्थी प्रवेश घेतात. अशाही परिस्थितीत नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेल्या गगनगिरी विद्यालयाचा निकाल खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यालयात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख उपाध्यक्ष डीएम देशमुख, सचिव कैलासशेठ काळे , संस्था पदाधिकारी स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत विविध संस्था पालक शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले
