अभाविपचे दोन दिवसीय अनुभूती शिबीर उत्साहात संपन्न
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,अंबाजोगाई आयोजित श्रमानुभव शिबीर तालुक्यातील दौंडवाडी येथे दिनांक ३ व ४ जुन रोजी संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन गावचे सरपंच धनंजय भाऊ फड, उपसरपंच मधुकर मामा दौंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभाविपचे जिल्हा प्रमुख प्रा. नाथराव गरजाळे सर, शिबिर प्रमुख साक्षी हारे अंबाजोगाई जिल्हा संयोजक महेंद्र उजगरे उपस्थितीत होते. शिबीर कालावधीत मैदानी खेळ, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, सामाजिक विषयावर पथनाट्य, वनभोजन, घैषणासत्र, व्यसनमुक्ती या विषयावर जनजागृती करणारे पथनाट्य आदी उपक्रम घेण्यात आले. यावेळी शिबीरार्थींसमोर अभाविपच्या विचारांची मांडणी महेंद्र उजगरे यांनी केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर व्यवस्था प्रमुख शिल्पा फड, अभिनंदन धर्माधिकारी, रवी साबळे, लक्ष्मण कुंभार यांनी यशस्वी प्रयत्न केले. या शिबीरास अभाविपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
