माका परिसरात “भाऊ,दादाच्या”कृपाआशीर्वादाने अवैध धंद्यास बढती ?.

 नेवासे(माका) / लोक वेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे_
नेवासे तालुक्यातील बहुप्रचलीत माका परिसरात प्रामुख्याने अवैध व्यवसायाबाबत, प्रशासकीय अधिकारी वर्गातुन दादा, तर स्थानिक पुढारी भाऊं च्या कृपा आशीर्वादाने अलीकडील काळात, “सत्तेतुन पैसा व पैशातुन सत्ता” उपक्रम राबवला जात असुन, निवडणूक काळात मतासाठी बेकायदा व्यावसायिकांना हाताशी धरुन सत्ता हस्तगत करण्यासाठी आपला स्वार्थ साधत अस ल्याचे तसेच, याबाबत माका गावात सध्यातरी लोकसंख्या सुमारे आठ_नऊहजाराच्या आसपास असताना स्थानिक सत्ता हस्तगत केल्यानंतर विकासाच्या नावाखाली, बाकीचे विकास कामे न करता, सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्यातरी ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या माध्यमातून गोरगरीब व्यावसायिकांची गावातील चहा व मिठाईची दुकाने मोडीत काढल्याचे तसेच बेकायदा दारु, गांजा, तिरटजुगार, तोता मैना सोरटांची दुकाने सत्ताधारी पुढारयांच्या वरद हस्ताने, भरदिवसा शेवगाव_पांढरीपुल रस्त्यालगत मोठ्याप्रमाणा त सुरू केली जात असल्याचे ग्रामस्थांकडुन बोलले जात आहे.

याबाबत असे की, याअगोदरही ऐन कोरोना काळात, तसेच आजरोजी सद्यस्थितीत तिन साडेतीन वर्षात, विकासाच्या नावाखाली दुसरयांदा ग्रामपंचायतीने हुकुमशाहीच्यामार्गा चहा,मिठाई दुकानदारांना कुठलीही पुर्वकल्प ना न देता दुकाने मोडीत काढली. यामुळे अनेक कुटुंबावर ती उपासमारीची वेळ आली असल्याने, हुकुमशाही विरोधा त ग्रामस्थ व वैध व्यावसायिकांकडुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सध्यातरी पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीकडुन पाणी,रस्ते,आरोग्य, शिक्षण, दिवाबत्ती, सार्वजनिक शौचालय, लघुशंका शेतीविषयक धोरणासंब धी महत्वाची विकासकामे न करता, जनतेची दिशाभूल केली जात असुन, आजरोजी सत्ताधारयांनी चहा,मिठाई हॉटेल दुकानदारांची दुकाने पुर्वकल्पना न देता वेठीस धरत बंद करुन,अवैध दारु दुकानदारांना दादा_भाऊंकडुन अभय मिळत असल्याने, व याअगोदर संबधित शासकीययंत्रणेस अवैधव्यवसाय बंदीबाबत ग्रामसभेचे(ठराव ) निवेदनं देवुन ही, वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊनही परीसरात मोठ्या प्रमाणात दारुविक्री,इतर बेकायदा व्यवसाय तेजीत सुरु असल्याचे संबधित ग्रामस्थांकडुन बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!