खा. राऊतसाहेब यांच्या प्रतिमेला जोडे मारणारावर गुन्हे दाखल करा – अमर कतारी

खासदार संजय राऊत साहेब यांच्यावर जोडे मारो आंदोलन करून गैरकृत्याची गर्दी जमा करून त्यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे बाबत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे याना निवेदन देण्यात आले

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर बसस्थानकासमोर  04जून 2023 संगमनेर येथील शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेना पक्षाचे विद्यमान खासदार संजय राऊत साहेब यांच्या प्रतिमेला विनापरवानगी जोडेमारो आंदोलन केले व त्यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीच्या घोषणा देऊन शिव्या देण्यात आल्या तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत साहेब यांची बदनामी होईल या हेतूने गर्दी जमा करून कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व म्हणूनच खालील व्यक्तींवर रितसर गुन्हा दाखल करावा ही विनंती खा. संजय राऊत साहेब हे नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू निर्भीडपणे मांडत असतात ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्या विरोधात अशा प्रकारचं घरगुती करणाऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
सदर घोषणाबाजी व बदनामी कारक वक्तव्य करणारे व्यक्ती खालील प्रमाणे आहेत 1विठ्ठल ढगे 2वसंत मतकर 3बाळासाहेब राऊत 4अमोल रानाते 5 वैशाली तारे 6राहुल पवार 7सुदाम खैरे 8अभिषेक गायकवाड 9बाळासाहेब व्यवहारे 10अजिज कुरेशी 11अन्सार सय्यद 12शाहरुख शेख 13लाला शेख 14लल्लू कुरेशी या व्यक्तींवर आपण रीतसर गुन्हा दाखल करावा ही विनंती करण्यात आली
सदर निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )शहर प्रमुख अमर भाऊ कतारी ,तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे ,संपर्कप्रमुख नरेश माळवे, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे ,युवा सेना चे फैसल सय्यद ,सचिन साळवे अनिल खुळे सलमान शेख शोएब शेख तिलक गांधी उपशहरप्रमुख इम्तियाज शेख अजिज मोमीन ,दीपक वन्नम,सचिव सुदर्शन इटप पंचायत समिती सदस्य अशोकराव सातपुते अशोक बडे फरोज कतारी आदी शिवसैनिकांच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!