जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या २१४ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका­

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव प्रभागातून निवडणून आल्यानंतरही मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दणका दिला असून बीड जिल्ह्यातील तब्बल २१४ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

हे सदस्य 2021 च्या निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडून आले होते कोरोनामुळे या सदस्यांना या सदस्यांना मुदतवाढ देऊन देखील यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही

वारंवार संधी देऊ नये 2021 मध्ये निवडणूक मध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र साधारण केले नाही. 2021 मध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्याने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाहीत असा अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांनी दिल्याने 214 ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे . जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी 214 सदस्याना अपात्र केले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच वेळी एवढ्या सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे .या ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या कमी झाल्याने राजकीय गणित बदलणार आहे.
???? *जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!