मोर्चाहून परतताना समनापुरात मोर्चेकर्‍यांवर दगडफेक ; समनापूरमध्ये तणावपूर्वक शांतता
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर हे क्रांतीचे व चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या शहराने अनेक मोर्चे, अनेक आंदोलने व दंगली अनुभवल्या आहेत. मात्र आज सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाने आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर मोर्चेकरी घरी जात असतांना समनापूर या ठिकाणी काही दुकाने उघडी असल्याने बाचाबाचीतून दोन गटात हुल्लडबाजी झाली. अचानक झालेल्या घटनेने एकाच पळापळ झाली. त्यामुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी तोडफोड झाली यात काहींना मारहाण झाली. मात्र पोलीसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.
संगमनेरकरांनी अनुभवला अनोखा मोचा
संगमनेर हे क्रांतीचे व चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या शहराने अनेक मोर्चे, अनेक आंदोलने व दंगली अनुभवल्या आहेत. मात्र आज सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाने आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. एक मोर्चा एक रंग असा निघालेल्या शिस्तबद्ध व तितकाच परिणामकारक असणारा हा मोर्चा संगमनेरच्या इतिहासात कायम राहिल. विशेष करून या मोर्चात ग्रामिण भागातील नागरीकांनी व तरूणांसोबत तरूणींनी घेतलेला सहभाग हा उल्लेखनीय होता. मोर्चाचे नियोजन करणाऱ्यांनीही घेतलीली मेहनत सार्थ ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!