पाटोदा ममदापूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अनुदानासाठी उपोषण

वेळोवेळी मागणी करूनही शेतकऱ्यांना न्याय मिळेना

 

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा महसूल मंडळातील शेतकरी खरीप २०२२ सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले आहेत. वेळोवेळी निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी तारीख ९ जुन शुक्रवारपासून अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
पाटोदा ममदापूर महसूल मंडळात गेल्यावर्षी खरीप हंगाम २०२२ ला अतिवृष्टी व पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पाटोदा-ममदापुर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आम्हाला नुकसान झालेल्या पिकाचे अनुदान द्यावे अशी वेळोवेळी मागणी केली होती परंतु महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. सोयाबीनसह इतर पिकाचे नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पाटोदा महसूल मंडळातील केशव नाना ढगे,रवींद्र ढगे,मेघराज ढगे, एन. डी. पवार, अगस्ती ढगे,हरिदास ढगे, गोविंद ढगे, तुकाराम पाचभाई आदी शेतकरी उपोषण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!