मोर्चाहून परतताना समनापुरात मोर्चेकर्‍यांवर दगडफेक ; समनापूरमध्ये तणावपूर्वक शांतता
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर हे क्रांतीचे व चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या शहराने अनेक मोर्चे, अनेक आंदोलने व दंगली अनुभवल्या आहेत. मात्र आज सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाने आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर मोर्चेकरी घरी जात असतांना समनापूर या ठिकाणी काही दुकाने उघडी असल्याने बाचाबाचीतून दोन गटात हुल्लडबाजी झाली. अचानक झालेल्या घटनेने एकाच पळापळ झाली. त्यामुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी तोडफोड झाली यात काहींना मारहाण झाली.
 दगडफेकीत काही चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती  आहे. तर दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, देविदास ढुमणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करत नाही करण्यात आला असून पोलीस नेमकी घटना कशी घडली याची माहिती घेत आहेत. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लोकवेध live न्यूज शी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!