अखेर भगव्या मोर्चास परवानगी मिळाली !
सकल हिंदू ऐक्याची ताकद दिसणार
संगमनेर / लोक वेध live न्यूज
जोर्वेनाका येथे गेल्या रविवारी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजातील दिसू लागला असून अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी दि.६ रोजी संगमनेरातून ‘भगवा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चाबाबत गेल्या दोन दिवसांत समाज माध्यमात वेगवेगळ्या अफवाही पसरविण्यास सुरुवात झाली होती पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या अफवांचाही त्यात समावेश आहे. मात्र याबाबत शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी काही अटी व शर्थीच्या  नुसार या मोर्चाला परवानगी दिल्याची
संगमनेरातील निघणाऱ्या या ‘भगवा मोर्चा’च्या मार्गातील परवानगीचा अडथळा दूर झाला आहे. शहर पोलिसांनी काही अटी व शर्थीवर या मोर्चाला परवानगी दिली आहे. या मोर्चात सहभागी होता यावे यासाठी संगमनेर व अकोले शहरातील विविध संस्था, संघटना, समाज व व्यापारी संघटनाही पुढे सरसावल्या असून संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा बोलावून मोर्चाला पाठिंबा दाखविला आहे आपापल्या गावातील व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे मंगळवारी संगमनेरातून ऐतिहासिक मोर्चा निघण्याची दाट शक्यता आहे.
सकल हिंदू समाज मोर्चा आयोजकांकडून मंगळवारच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून या मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रचंड असेल असा अंदाज आहे. गेल्या चार दिवसांत मोर्चाच्या आयोजकांना संगमनेर व अकोले तालुक्यातील अनेक संस्था, संघटना, मंडळे व व्यापारी संघटनांसह विविध समाजाच्या विश्वस्त मंडळांचे लेखी पत्रही प्राप्त झाले असून त्या सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर करतानाच संघटनेशी व समाजाशी संलग्न असणाऱ्या नागरिकांना आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!