लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त अंबाजोगाई येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

अंबाजोगाई / लोकं वेध live न्यूज / सुरेश मंत्री

लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंती निमित्त वारकरी व भावीक भक्तांसाठी अंबाजोगाई येथे शिवसंग्राम अंबाजोगाई तालुका च्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन शिवसंग्रामचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष धनेश गोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबाराचा लाभ शेकडो वारकरी व भाविक भक्तांनी घेतला.
अंबाजोगाई येथे संत नामदेव महाराज पालखी येते या दिंडीतील वारकरी तसेच भाविक भक्तांसाठी लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीर व औषधोपचाराचे आयोजन शिवसंग्राम अंबाजोगाई तालुका च्या वतीने करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन संत नामदेव महाराज पालखी अश्वरिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, दिलीप सांगळे, जेष्ठ पत्रकार दत्ता अंबेकर,सुदर्शन रापतवार, सतीश गंगणे, संग्राम महाराष्ट्राचे संपादक अभिजीत लोमटे यांची उपस्थिती होती.
शिवसंग्राम तालुकाध्यक्ष धनेश गोरे हे मागील ५ वर्षांपासून संत नामदेव महाराज पालखीत येणाऱ्या वारकरी व भक्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. दर वर्षी लोकनेते विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसा निमित्त या शिबिराचे आयोजन करत स्तुत्य उपक्रम राबवित होते मात्र या वर्षी लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंती निमित्त शिबिराचे आयोजन करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे अशी खंत तालुकाध्यक्ष धनेश गोरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!