कुत्र्याला वाचवण्याच्या नादात टेम्पो पलटी

 संगमनेरनजीक नाशिक-पुणे महामार्गावर माहुली शिवारात  घटना घडली
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही
संगमनेर  / लोकवेध live न्यूज
संगमनेरमधून विविध कंपन्यांचे बिस्किटांचे बॉल्स घेऊन आळेफाटाच्या दिशेने जाणारा टेम्पो नाशिक- राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारामध्ये आडव्या जाणाऱ्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटल्याने टेम्पोसह बिस्किटांचे नुकसान झाले आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव नजीक माहुली गावच्या शिवारात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी देखील टेम्पो चालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चालक या अपघातातून बचावला.

विलास श्रीपती मांजरे (रा. मांजरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हा आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये संगमनेरमधून विविध कंपन्यांची बिस्किटे घेऊन गुरुवारी रात्रीच्या वेळी आळेफाटाच्या दिशेने जात असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माहुली गावच्या शिवारात टेम्पोला अचानकपणे एक कुत्रे आडवे आले. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातात चालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला असून टेम्पोसह टेम्पोमधील बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

अपघाताची माहिती काही नागरिकांनी महामार्ग पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी नारायण ढोकरे, भरत गांजवे कैलास ढोंबरे यांनी तातडीने अपघात स्थळी जात मदत कार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!