आम्हा दोघांपैकी एक जण निश्चितच शिर्डी लोकसभेची निवडणुक लढवेल : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले
लोणी / लोकवेध live न्यूज
खासदार डॉ सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे हे माझे चांगले मित्र आहेत शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता मी इच्छुक आहे मात्र अदयाप असा ठोस निर्णय घेतला नाही कारण माझी राज्यसभेची मुदत ही २०२६ पर्यंत आहे मात्र विखे पाटील , खा लोखंडे आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेवून मात्र आमच्या दोघापैकी एक जण निश्चितचं शिर्डी लोकसभेची निवडणुक लढवेल : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले
लोणी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ना रामदास आठवले बोलत होते . विशेष म्हणजे खा डॉ सुजय विखे पाटील व खा सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत ना . आठवले यांना शिर्डी लोकसभा निवडणुक इच्छुक आहात हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असतात हसत हसत मिश्किलपणाने आठवले यांनी उत्तर दिले .
ना रामदास आठवले म्हणाले की , राज्यामध्ये कितीही नविन के सी आर सारख्या पाटर्या आल्या तरी काही फरक पडणार नाही तर पाटण्यात १७ पक्षाचे विरोधक एकत्र आले होते त्याच्यावर टिका करताना रामदास आठवले म्हणाले की , १७ विरोधक एकत्र आले अगर १०० विरोधक एकत्र आले काही फरक पडणार नाही नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून हे नेतृत्व हलणार नाही गोर गरिब , कष्टकरी , शेतकरी , आदीवाशी , मागसवर्गिय व सर्व सामान्य घटकासाठी नव – नविन योजना आणून त्यांना सक्षम केले . देशात नव्हे तर जगात नरेंद्र मोदीनी एक वेगळी ओळख निर्माण केली . आज अमेरिका सारखा देशाचा प्रमुख मोदीची वाट पहातो हा एक सन्मान निर्माण केला .
उद्धव ठाकरे यांनी कै बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केल्यानेचं त्यांची आवस्था बिकट झाली त्यांचे आमदार निघून गेले . त्यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले पाहिजेल अशी माझी इच्छा असून कॉग्रेस – राष्ट्रवादीमुळे त्यांचे नुकसानचं होणार आहे .
सामाजिक न्याय विभागातंर्गत वयोश्री ही योजना खर्या अर्थाने डॉ सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात राबविली . आज १७२६ दिव्यांगाला साहित्य वाटप करण्यात आल्याने मनस्वी आनंद होत आहे दिव्यांगाला शैक्षणिक क्षेत्रात ५ % आरक्षण तर नोकर्याकरिता ४ % आरक्षण असल्याने शासकिय क्षेत्रासह खाजगी क्षेत्रातही दिव्यांगाला समावून घ्या असे आवाहन आठवले यांनी शेवटी केले .
