पालिका कर्मचारी सुतावणेची मुजोरी; महिले सोबत अरेरावी गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुख्यमंत्र्याच्या पीए मार्फत संगमनेर नगरपालिकेचा कारभार चालतो का ?
संगमनेर / लोक वेध live न्यूज / भारत रेघाटे
म्हाळुंगी नदीवरील पूल पडल्यानंतर स्थानिक माजी नगरसेवक कैलास वाकचौरे आणि माजी नगरसेविका अल्पना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाच्या बांधकामासाठी पुढाकार घेवून वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलने केले. परंतु दरम्यानच्या काळात पालिकेकडून आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने अल्पना तांबे नगरपालिकेत अभियंता राजेंद्र सुतावणे यास भेटण्यासाठी गेल्या व पुढील कारवाई करण्यासाठी विचारना केली असता सुतावणे यांनी उद्घटपणे वागून उडवाउडवीचे उत्तर देत अरेरावीची भाषा केली. महिलेसोबत असे गैरवर्तन करणे एक जबाबदार कर्मचाऱ्याला शोभत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने
याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देताना बेजबाबदार वागनाऱ्या
सुतावणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. तद्वतच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सदर स्थानिक शहर पोलिसात निवेदन देण्यासाठी गेले सुतावने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार धीरज मांजरे, प्रांतअधिकारी शैलेश हिंगे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे
यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अभियंता सुतावणे हे ठेकेदाराची पाठ राखण करून सरकारी कामाकडे दुर्लक्ष करीत आहे.सोयीने कामाची जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसून येत आहे. अभियंता सुतावणे यांचे बदली येवला येथे झालेली असून ते संगमनेर नगरपालिकेचा चार्ज का सोडत नाही.? सदर व्यक्तीची बदली रद्द करण्याबाबत कोणी दबाव किंवा शिफारस करत असेल तर संबंधितांवर 19 मे रोजी च्या आदेशानुसार अट क्रमांक पाच नुसार नागरी सेवा वर्तणूक नियम १९८० च्या नियम 23 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेश संचालयाचे असताना आदेशाचे उल्लंघन का झाले आहे . तरी संबंधितावर कारवाई करावी संबंधित अभियंता हा गुन्हेगारी व घोटाळ्याची पार्श्वभूमी असताना देखील त्याला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे पीए का पाठीशी घालतात.? सदर अभियंता मुख्यमंत्र्याच्या पीए मार्फत नगरपालिकेत फोन करून अधिकाऱ्यांना दबाव आणतो म्हणून त्यांची बदली होऊन देखील ते चार्ज सोडत नाहीत. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे संगमनेर शहरातून बांधकाम परवानगी बाबत झालेले गैरवावर केल्याप्रकरणी
त्याची कायदेशीर चौकशी करून त्यांच्या कारवाई करावी . तसेच येथील नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या व महिलां सोबत असभ्यतेचे वर्तन करणाऱ्या सुतावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी वैशाली घोडेकर, अर्चना राऊत, विशाल सोनवणे, दत्तात्रेय गुजर ,नंदलाल भाटिया, मनीषा तांबे, अल्पना मेहतर, सोनाली म्हाळणकर , जनाबाई भोर, माधव चव्हाण, छाया भांगे, मच्छिंद्र कल्याणकर , बाळू आप्रे, राम घोरपडे, विकास घुगे, मंदा ठोंबरे, सुषमा नगरकर आदि उपस्थित होते. सुतावणे यांच्यावर कारवाई न झाल्यास माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
