गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालयात रंगला बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा…..

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

दिनांक 28 जून 2023 रोजी शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा आयोजित केला होता. सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी थोरात मॅडम, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे , प्रा.घाडगे सर ,माध्यमिक विभागाचे सत्र प्रमुख श्री. जोशी सर, गावित सर या सर्वांनी दिंडीचे पूजन करून बाल वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज श्री गुलाब गायकवाड सर , गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संगमनेर सिन्नर विभागाच्या अधीक्षक डॉ. अस्मिता देशपांडे मॅडम यांनीही बाल वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर विठू नामाच्या गजरात व ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत ही बाल वारकऱ्यांची दिंडी शहरातील विठ्ठल मंदिरात विसावली. संपूर्ण परिसरात भक्तिमय असं वातावरण तयार झाले होते. परिसरातील अनेक नागरिक व पालकांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. मंदिरात गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन शिक्षकांबरोबर भजन गायनाचा आनंद घेतला. जनसंपर्क अधिकारी श्री .बाबासाहेब मेमाणे साहेब यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून बाल वारकऱ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून शेवटी सामुदायिक आरतीने दिंडीची सांगता करण्यात आली. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम. परिघा कुटे मॅडम, सौ. सुनिता गोडसे मॅडम, श्रीम. सुरेखा साळवे मॅडम, श्रीम. मंदाकिनी हासे मॅडम , श्रीमती रेखा दातीर ,अमृता गोडसे मॅडम, सौ मनीषा दसरे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माधव एरंडे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!