अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला चौथ्यांदा एनबीएचे मानांकन

सलग चौथ्यांदा मानांकन मिळवणारे पहिले महाविद्यालय

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

उच्च गुणवत्ता, सर्व अत्याधुनिक सुविधा ,उत्कृष्ट निकाल यांसह विद्यार्थ्यांची होणारी प्लेसमेंट यामुळे विविध राष्ट्रीय पातळ्यांवरील विविध पुरस्कार मिळालेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून सर्व पात्र विभागांना एनबीएचे मानांकन मिळाले आहे. सलग चौथ्यांदा मानांकन मिळवणारे अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हे पहिलेच महाविद्यालय ठरले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश , व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ व्यंकटेश म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी ही देशातील उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था ठरली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, नेक चा ए प्लस दर्जा, आयएसओ मानांकन यांसह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार या महाविद्यालयाला मिळाले आहेत.
नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन या संस्थेच्या वतीने झालेल्या मूल्यांकनात मेकॅनिकल इंजिनिअरिंग ,इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागांना एनबीए चे तीन वर्षाकरिता मानांकन मिळाले आहे. तर पहिल्या फेरीत सिव्हिल, आयटी ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विभागांना एनबीएचे मानांकन मिळाले होते.
याचबरोबर नुकतेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स साठी 60 जागा, तसेच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या विभागास प्रत्येकी 60 -60 जागा प्रवेशासाठी वाढवून दिलेल्या आहेत. उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबरच यावर्षी 604 विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये चांगल्या पगारावर निवडी झाल्या आहेत.
एमबीएच्या समितीत आयआयटी रुरकी चे डॉ संजय कुमार घोष, यांच्या अध्यक्षखाली तीन दिवसांची परीक्षण करण्यात आले या समितीमध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ नवी दिल्ली, जोधपूर विद्यापीठ ,पश्चिम बंगाल, आर्मी इंजिनिअरिंग कॉलेज, बंगलोर या विद्यापीठांमधील  प्राध्यापकांचा समावेश होता. यावेळी या समितीने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध योजना, टिचिंग अँड लर्निंग पद्धत, आउट कम बेस्ट शिक्षण पद्धती, संशोधन कार्य, पेटंट, ग्राउंड, प्रोजेक्ट, गुणवत्ता धोरण, गुणवत्ता उद्देश व परिणाम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ,पीएचडी धारक शिक्षकांची उपलब्धता, जपान- जर्मन भाषा प्रशिक्षण, डिजिटल लायब्ररी, तांत्रिक कार्यशाळा, शैक्षणिक निकाल, वातावरण आदी गुणवत्तेच्या निकषांची मूल्यांकन केले. यावरून या तिन्ही विभागांना हे मानांकन दिले आहे.
यावेळी या समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार घोष म्हणाले की, मी आत्तापर्यंत 80 महाविद्यालयांना एमबीए साठी भेटी दिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील उपक्रमशील व समाजाभिमुख असणारे हे महाविद्यालय आहे.
गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन काम करणारे नेतृत्व क्वचितच पहावयास मिळाले आहे.
या मानांकनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक डॉ.रेखा पी.लबडे, डॉ. विष्णू वाकचौरे, डॉ. सुनील कडलग , प्रा. राहुल पाईकराव यांसह विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
एनबीएच्या या सलग चौथ्या मानांकनाबद्दल काँग्रेस नेते व संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख ,इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, ॲड.आर.बी. सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, बाजीराव पा.खेमनर, विलास वरपे, संपतराव गोडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, व्यवस्थापक प्रा व्ही बी धुमाळ, रजिस्टर प्रा. विजय वाघे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले आहे

 

हिरवाई व स्वच्छतेचे कौतुकसहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील हिरवाई निर्माण करताना या परिसरात विविध वृक्ष, बांबूचे बन, स्वच्छ व सुंदर परिसरात समवेतच सौरऊर्जेतून होणारी वीज निर्मिती, पाण्याचा पुनर्वापर, एसटीपी प्लांट ,होस्टेल, मेस सुविधा, डिजिटल लायब्ररी, शेतीविषयक प्रकल्प ,या विविध उपक्रमांचेही या राष्ट्रीय समितीने कौतुक केले असून हे सर्व उपक्रम इतर महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक असल्याचेही म्हटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!