शैक्षणिक संस्कार आणि सामाजिक एकात्मता हेच समाजाच्या उन्नतीचे अंग : संजय गव्हाळे
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कु.वैदेही दिपक इंगळे सत्कार वर्ग १० वी मध्ये मिळविले ९२ टक्के गुण
नाशिक / लोक वेध live न्यूज/ निलेश शेकोकार
शैक्षणिक,आध्यात्मिक संस्कार आणि सामाजिक एकात्मता समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असून येणाऱ्या पिढीला याची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाळे यांनी कु.वैदेही इंगळे हिने वर्ग १० वी मध्ये ९२ टक्के गुण मिळविल्याबद्दल सत्कार प्रसंगी केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप माजी समाजकल्याण मंत्री यांच्या संकल्पनेतून नितीन विहार कॉलनी,शिवाजीनगर जवळ साई नगर अमरावती येथील कु.वैदेही दिपक इंगळे समर्थ हायस्कूलची विद्यार्थिनी हिला वर्ग १० वी मध्ये ९२ टक्के गुण मिळविल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रिय चर्मकार महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून
यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाळे,जिल्हा उपाध्यक्ष जगदेव रेवसकर,राहुल विरुळकर,सामाजिक कार्यकर्ते किशोर इंगळे हे होते.या कार्यक्रमाला दिपक इंगळे,सौ.कल्पना इंगळे,सौ.कविता इंगळे,रत्नाताई मोहोकार,संगीता दावेदार,वेदांत इंगळे आदिची उपस्थिती होती.
