अहमदनगर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस साहेब यांची पेटिट ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट!

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व अहमदनगर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा.अशोक कडूस साहेब यांनी शिक्षण शास्त्र महाविद्यालय व पेटिट जुनियर कॉलेजला सदिच्छा भेट दिली . मा. अशोक कडूस साहेब यांचे विद्यालयाच्या अधीक्षक डॉ.अस्मिता देशपांडे , शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ बी एस मुरादे , जुनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला . यावेळी कडूस साहेब यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेत.येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा १९९३ – ९४ बॅचचा मी विद्यार्थी आहे . डॉ. बी एस मुरादे माझे गुरुवर्य आहे असे आवर्जून नमूद केले. तसेच आपल्या महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणींना उजाळाही दिला . याप्रसंगी त्यांच्या समवेत शिक्षण उपनिरीक्षक थोरात साहेब, पंडित सर आदी सह जुनिअर कॉलेजचे प्रा. भाऊसाहेब मांढरे , प्रा. दशरथ गभाले, प्रा. श्रीमती शिंदे एस व्ही मॅडम , श्री प्रदीप मोहिते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!