डॉ. अस्मिता देशपांडे पेटिट विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. अस्मिता देशपांडे यांची नुकतीच निवड झाली आहे. डॉ. अस्मिता देशपांडे ह्या सध्या संगमनेर – सिन्नर सेंटरच्या अधीक्षक म्हणूनही काम बघतात. शालेय प्रशासनाचा ही त्यांना चांगला अनुभव आहे. प्रभारी प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री सतीश चंदन , सत्र प्रमुख श्री शरद जोशी , प्रकाश वनम , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!