बिबट्याचा प्राणघातक हल्ल्यातून वाचला चिमुरडीचा जीव ; चार मुलगी गंभीर जखमी
वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा
संगमनेर – लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खांडगाव शिवारातील बिरोबा वस्तीवर बिबटयाने एका 4 वर्षाच्या बालिकेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सदर 4 वर्षाची मुलगी गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची घटना सोमावारी सायंकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास घडली आहे. सदर मुलगी विजय बालोडे यांची असून तिचे नाव ईश्वरी आहे. या घटनेने खांडगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नरभक्षक बिबट्या असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. कारण सदर मुलीच्या चेहर्यावर, मानेवर झालेल्या गंभीर इजेमुळे सदर बिबट्या चेतावळलेल्या अवस्थेत होता असे लोकांनी सांगितले. सदर मुलीवर मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून वन विभागाला याबाबतची याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. वन विभागाने त्वरीत पिंजरा लावून सदर प्राणघातक हल्ला करणार्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खांडगाव येथील बिरोबा वस्तीवर रहिवाशी असलेले विजय सखाराम बालोडे यांची मुलगी ईश्वरी घराबाहेर खेळत असतांना दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने सदर मुलीवर झडप घालून तीला गंभीर स्वरूपात जखमी केले तिच्या मानेवर डोक्यावर, चेहर्यावर गंभीर जखमा झाल्या तर इतर ठिकाणी ही बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या आहेत सदर मुलीला मेडिकव्हर हॉस्पिटल येथे तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले आहे. या घटनेने खांडगाव शिवारात दहशत पसरली आहे म्हणून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी खांडगाव येथील नागरीकांनी केली आहे.
