मा आ. डॉ. सुधीर तांबे शिक्षक होतात तेव्हा…
डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांचा घेतला गणिताचा क्लास
संगमनेर / लोकवेध live न्यूज
उच्च विद्याविभूषित व निष्णांत सर्जन असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची शिक्षणाप्रतीची तळमळ ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असून त्यांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात चिमुकल्यांना गणित विषय शिकवून बराच वेळ विद्यार्थ्यांची संवाद साधला.
शिबलापुर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आमदार डॉ तांबे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर ,डॉ संजय सांगळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या विद्यालयाच्या पाहणी समवेतच माजी आमदार डॉ तांबे यांनी तिसरीच्या वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना गणित हा विषय शिकवला.
ज्ञानमाता विद्यालयातून प्रथम आलेल्या आमदार डॉ तांबे यांनी पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज मधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले . एम एस पदवी घेतल्यानंतर त्यांनी संगमनेर मध्ये आरोग्य सेवा सुरू केली अत्यंत निष्णांत सर्जन असलेल्या आमदार डॉ तांबे यांची सामाजिक कार्याची आवड ,वाचन, मूकबधिर व दिव्यांगासाठी चे कार्य, शिक्षणा प्रतीची तळमळ, आरोग्य व्यवस्थेबद्दलची काळजी यातून लोकआग्रहास्तव ते संगमनेर शहराचे नगराध्यक्ष झाले.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. 54 तालुक्यात सर्वाधिक संपर्क करताना त्यांनी मोठा प्रवासही केला. याचबरोबर विधान परिषदेत सातत्याने शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी आवाज उठवला. शिक्षण सेवक मानधन वाढ, जुनी पेन्शन योजना, कृषी ,जलसिंचन, रस्ते अपघात, बेरोजगार महामंडळ अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणीतून सरकारचे लक्ष वेधून हे प्रश्न मार्गी लागले आहेत.
शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीतून त्यांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात छोट्या चिमुकल्यांना गणित हा विषय शिकवला. हातात खडू, डस्टर घेऊन विद्यार्थ्यांना शिकवताना ते रमामान झाले. दीड तास विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत आमदार डॉ. तांबे यांनी गणित शिकवले .याचबरोबर प्रश्न- उत्तरे घेत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला
यानंतर बोलताना मा. आ डॉ तांबे म्हणाले की ,विद्यार्थी जीवन हे माणसाच्या जीवनातील सर्वात सुंदर जीवन असते . आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात ग्रामीण व शहरी अशा सर्व शाळांमधून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात असून परिपूर्ण विद्यार्थी घडवले जात असल्याचेही ते म्हणाले
