पेटिट जुनियर कॉलेजमध्ये ११वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत !
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटिट विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये प्र. प्राचार्या डॉ. अस्मिता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ वी कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव व बाळासाहेब यादव यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव स्वर्गीय डॉ. मो . स . गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
निवांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर अभ्यास करावा अभ्यास करताना जे विषय अवघड आहे त्यांचा अगोदर अभ्यास करून सोप्या विषयांचा नंतर अभ्यास करावा. अभ्यास करताना मोबाईलचा वापर टाळावा. इंस्टाग्राम , फेसबुक यांचे धोके सांगून पोस्को अंतर्गत येणाऱ्या विविध गुन्ह्यांची माहिती यावेळी पीएसआय जाधव यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली. इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. स्वप्निल शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय, प्रा. दशरथ गभाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा. सुनीता शिंदे यांनी सूत्रसंचालन करून प्रा. भाऊसाहेब मांढरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले . या कार्यक्रमासाठी प्रा. परेश सांगवीकर प्रा. अमोल टेमक प्रा. रूपाली देशमुख प्रा. सुशीला चिमणकर प्रा. सिमिका मिश्रा , श्री संतोष धुळे,श्रीमती मनीषा खाटेकर आदींसह ११वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
