शिर्डी लोकसभा संदर्भात राजेंद्र वाघमारे आणि सहकाऱ्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांची भेट घेतली…

 

मुंबई / लोकवेध live न्यूज 

 

मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळेस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांची जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बंटी भाऊ यादव,संजय भोसले, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे,संभाजी माळवदे,प्रकाश तुजारे आदींनी शिर्डी लोकसभा संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून डॉ. राजू वाघमारे यांना सविस्तर माहिती दिली.
डॉ.वाघमारे म्हणाले की आमचे नेते,काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला घेतली तर बाळासाहेब थोरात निश्चित विजय खेचून आणतील यात तीळ मात्र शंका नाही
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने डॉ.राजू वाघमारे यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.
यावेळी सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर पाटील कडू, सोशल मीडिया काँग्रेसचे सचिन बोर्डे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे दीपक कदम, परिवहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!