आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढा व गद्दाराना कायमचे घरी बसवा -शुभांगी ताई पाटील

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज

काल दिनांक०८ जुलै रोजी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी १२ वाजता संगमनेर तालुका महिला आघाडीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका , ग्रामपंचायत व सर्व संस्थांच्या निवडणुका संदर्भात तसेच महिला आघाडी सक्षमीकरण या सर्व नियोजनांसाठी आढावा बैठक मीटिंग बोलवण्यात आली या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संघटिका शुभांगी ताई पाटील यांनी मार्गदर्शन केले व आगामी निवडणुका पूर्ण ताकतीने लढण्याचे संकेत देत यांनी गद्दारी केली त्या सर्व गद्दारांना गाडा व उद्धव साहेबांचे हात बळकट करा असे मतही व्यक्त केले यावेळी उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटिका शुभदा ताई शिंदे यांनी देखील आपले मत व्यक्त करताना सांगितले की येणाऱ्या काळात महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि महिलांना न्याय व सुरक्षा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतच आहे म्हणून येणार्या निवडणुका सर्व महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढाईच्या व जिंकायचा, शिवसेनेच्या व उद्धव साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभं राहायचं आहे, यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका सपनाताई मोरे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आले हे सर्व जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही एकाच पक्षात प्रामाणिक राहिला तर जनता, मतदार देखील तुमच्या पाठीशी उभे राहतात पद आज आहे उद्या नाही किंवा आज छोटे पद असेल तर भविष्यात मोठे पद मिळेल परंतु आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहूनच तुम्हाला मानसन्मान मिळतो, यावेळी विसपुते ताई व परदेशी ताई यांनी देखील मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व मार्गदर्शन नियोजन, शिवसेना संगमनेर शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांनी केले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड अकोले तालुकाप्रमुख मनोज मोरे उपजिल्हाप्रमुख महेश नवले उपस्थित होते त्याचप्रमाणे महिला आघाडी उप जिल्हा संघटिका आशा केदारी जिल्हा सरचिटणीस सुरेखाताई गुंजाळ महिला तालुका संघटिका शितलताई हासे महिला शहर संघटिका संगीता ताई गायकवाड
यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील महिला आघाडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!