गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांचे दुःखद निधन

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ.मो. स. गोसावी यांचे रविवार दिनांक ९ जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. डॉ .गोसावी यांनी गरीब , आदिवासी व बहुजन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ठाणे, पालघर , बोर्डी , जव्हार , तलासरी या आदिवासी जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्था उभ्या करून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. आज लाखो विद्यार्थी गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षण घेत आहे. त्यांच्या निधनाने गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये न भरून येणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार , नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शहरातील पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,शिक्षण शास्त्र महाविद्यालय तसेच पेटिट प्रायमरी विभागातील कर्मचाऱ्यांनी डॉ गोसावी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अत्यंत शोकाकुल वातावरणात डॉ. गोसावी यांच्यावर नाशिक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या मुंबई ,ठाणे ,पालघर , नाशिक झोनमधील हजारो कर्मचारी आजी माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!