शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आमचा समाज आपल्या सोबत राहिल.. – आमदार रवींद्र धंगेकर
अहमदनगर / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे येथे भेट घेतली

यावेळी धंगेकरांनी वाघमारे यांच्याशी चर्चा करताना बोलले की शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा लोणारी समाज असून त्यांना आपल्या पाठीशी उभे करण्याचे काम नक्कीच मी करेल आणि आपल्यासाठी मी कधीही उभा राहील असे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले
यावेळी जिल्हाध्यक्षांनी वाघमारे यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने धंगेकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी भाऊ यादव, जिल्हा काँग्रेसचे कमलेश गायकवाड, शहर काँग्रेसचे मा.अध्यक्ष रंजन दादा जाधव, आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
