वैजापुरात सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
वैजापूर / लोकवेध live न्यूज
वैजापूर शहरात सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा १७६ वा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. २१ ते २८ ऑगस्ट दरम्यान संपन्न होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह संपर्क कार्यालयाचा शुभारंभ रविवारी सकाळी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सप्ताह समितीचे अध्यक्ष आ. प्रा. रमेश बोरनारे, उपाध्यक्ष साबेरखान, कार्याध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, कार्याध्यक्ष बाळासाहेब संचेती, सचिव बाबासाहेब जगताप, यांच्यासह प्रमुख मान्यवरांसह मोठया संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
शहरातील लाडगाव चौफुली परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजनासाठी संपर्क कार्यालय स्थापन केलेले संपर्क कार्यालयासह महंत रामगिरी महाराजांनी सप्ताहाचे प्रचार साहित्याचा लोकार्पण केले. २३ वर्षाच्या बहुप्रतिक्षेनंतर शहर परिसरात आयोजन केलेल्या सदगुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात शहर व ग्रामीण भागातील सर्वानी हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहन सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले. पुणतांबा येथे सप्ताह आयोजनाचे अधिकृत श्रीफळ घेण्यासाठी संयोजन समितीच्या पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे त्यांनी सूचित केले.

सप्ताह समितीचे अध्यक्ष आ. रमेश बोरनारे यांनी वैजापूर शहर व ग्रामीण भागातील भाविक एकत्रित पुढाकारातून आयोजित केलेला १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह अभूतपूर्व यशस्वी करण्याची ग्वाही दिली. सुत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, माजी सभापती अविनाश गलांडे, माजी सभापती अँड. प्रमोद जगताप, माजी जि प सदस्य मनाजी मिसाळ, भगवान नाना तांबे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, अँड. प्रताप निंबाळकर, माजी जि. प सदस्य पंकज ठोंबरे, प्रभाकर बारसे, तालुकाप्रमुख राजेंद्र सांळुके, माजी नगरसेवक लिमेश वाणी, शहरप्रमुख पारस घाटे, शैलेश चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष दिनेश राजपूत, बाजार समिती संचालक कल्याण जगताप, गणेश इंगळे, प्रविण पवार, गोरख आहेर 7 प्रशांत त्रिभुवन, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर टेके, गणेश खैरे, स्वप्नील जेजुरकर, वसंत त्रिभुवन, निलेश भाटीया, रामदास वाघ, संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, महेश बुनगे, कमलेश आंबेकर, प्रदीप सांळुके, गणेश पवार, ऋषी पवार, दत्तु खपके, मधुकर महाराज यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी, व्यापारी भाविक भक्तांची उपस्थिती
