श्रीक्षेत्र पिंपरणे ते श्रीक्षेत्र ताहाराबाद पायी दिंडीचे प्रस्थान
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
राहुरी तालुक्यातील प्रति आळंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र महीपती महाराज ताराहाबाद या ठिकाणी आषाढीच्या कामिका एकादशीला अनेक ठिकाणाहुन भक्त ताराहाबादच्या दिशेने प्रस्थान करतात. एकादशी निम्मित संगमनेर तालुक्यातील पिंपरणे ग्रामस्थ व महिपती महाराज भक्त मंडळाच्यावतीने श्री क्षेत्र पिंपरणे ते श्रीक्षेत्र महिपती महाराज ताराहाबाद पायी दिंडी सोहळ्याचे शिवभक्तमय वातावरणात प्रस्थान झाले
यावेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते माहिती महाराजांची महाआरती करण्यात आली यावेळी गावातील कैलासशेठ काळे, संजय बागुल, विनोद साळवे, गंगाराम वाकचौरे , उत्तमनाना राहिंज, नाना वाकचौरे, पोपट जाधव, सुदाम वाघमारे, दत्तू भादेकर, संजय भादेकर, कैलास ठोंबरे, सुदाम वाकचौरे, अण्णासाहेब वाकचौरे सुरेश करपे, रमेश राहिंज आदीसह भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
महाआरती होऊन दिंडीचे प्रस्थान झाले
टाळ मृदुंगाच्या तालावर महीपती महाराजांच्या जयघोषामधे महीपती महाराजांच्या रथ पालखीचे गावातुन गुरूवार दि १३ रोजी सकाळी १० वा सुमारास हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने हनुमान मंदिर पिंपरणे येथून ताराहाबादच्या दिशेने प्रस्थान केले. या दिंडीत महिला, अबालवृद्ध यांची उपस्थिती लक्षणीय होती. गावातील हनुमान भजनी मंडळाने दिंडी प्रस्थानासाठी विशेष सहकार्य केले
भगव्या पताका हातात घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात हरिनाम घेत ग्रामप्रदक्षिणा घेत हा पायी दिंडी सोहळा सुभाष रामराव ठोंबरे यांच्या वस्ती वर पोहोचला या ठिकाणी वारकऱ्यांना फराळाची व्यवस्था केली होती तर संजय भादेकर यांनी फळे अन्नदान केले
तरी या पायी दिंडीत अबालवृद्ध भाविकांनी सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करावा. असे अवाहन समस्थ ग्रामस्थ यांच्या वतिने करण्यात आले
