मराठा सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सतीशराव जोंधळे

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

 

निमगाव जाळी ता. संगमनेर येथील व महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे सहसचिव मा. सतीशराव कारभारी जोंधळे यांची मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे आपले नियमित काम सक्षमतेने सांभाळताना सामाजिक कामेही करता येतात अशा हेतूने प्रेरित झालेले निमगाव जाळी गावचे सुपुत्र सतीशराव जोंधळे साहेब यांची निवड हा सर्वांचाच कौतुकाचा विषय आहे.यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले केंद्रीय कार्यकारणीच्या मान्यतेने मा.सतीशराव जोंधळे यांची निवड करण्यात आली. सतीशराव जोंधळे यांचा सामाजिक शैक्षणिक कार्यात मोलाचा वाटा आहे निमगाव जाळी परिसरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली के.आर जोंधळे कृषी व सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक , कृषी व सामाजिक प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे सरपंच प्रतिभाताई जोंधळे चेअरमन ठकाजी थेटे, प्रवरा बॅंकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र पाटील थेटे, मा.सरपंच अमोल जोंधळे,सुनील दादा डेंगळे अशोक वदक, हेमंत तांदळे, दिलीपराव डेंगळे रमेश साठे,दिलीपराव शिवाजी डेंगळे, अशोकराव जोंधळे,काका तळोले, गिरीश तळोले, विलासराव जाधव, दत्ता जोंधळे,पत्रकार अशोक गोसावी,रवींद्र रसाळ ,सुरेश जोंधळे,टी.पी जोंधळे, नाना डेंगळे, जोंधळे बीजी,रमेश थेटे, विलास जोंधळे मच्छिंद्र तळोले, अशोक तळोले, भास्कर भालेराव, सुभाष जाधव, राजे परिवार व के आर जोंधळे कृषी व संस्थेचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!